Samsung Galaxy M42 5G भारतात येत्या 28 एप्रिलला होणार लॉन्च, Amazon India वर झाला लिस्ट
या बद्दलचा खुलासा ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर करण्यात आला आहे.
Samsung Galaxy M42 5G भारतीय बाजारात येत्या 29 एप्रिलला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे. या बद्दलचा खुलासा ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर करण्यात आला आहे. अॅमेझॉनवर अपकमिंग स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला असून तेथे या फोनची लॉन्चिंगची तारीख आणि वेळे संदर्भात माहिती दिली आहे. त्याचसोबत हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की, Galaxy M42 5G कंपनीचा 5G रेडी स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये Snapdragon 750G प्रोसेसर दिला गेला आहे. हा स्मार्टफोन युजर्सलला शानदार परफॉर्मेन्स क्षमतेसह उत्तम गेमिंगचा अनुभव देणार आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy M42 5G भारतीय बाजारात 20 हजार रुपये ते 25 हजारांच्या दरम्यान उतरवला जाऊ शकतो.
सॅमसंग कंपनीच्या या स्मार्टफोन बद्दल अॅमेझॉनवर असे स्पष्ट करण्यात आले आहे की, तो Qualcomm Snapdragon 50G चिपसेटवर काम करणार आहे. यापूर्वी समोर आलेल्या लीक्स आणि Geekbench वरील लिस्टिंगनुसार याच चिपसेटचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये Defense grade Knox Security आणि Samsung Pay सारखे खास फिचर्स मिळणार आहेत. हा फोन अॅन्ड्रॉइड 11 वर आधारित असणार आहे. तसेच यामध्ये 4GB रॅम दिला जाणार आहे.(Samsung Neo QLED TV भारतात लाँच, घरबसल्या मिळेल थिएटरचा अनुभव, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये)
याव्यतिरिक्त Amazon वर Samsung Galaxy M42 5G ची इमेज सुद्धा शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये फोन व्हाइट रंगात उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅशसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. तर फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच दिसून येतात. यामध्ये बॅकला फिंगरप्रिंट सेंसर ही दिला गेला आहे. ज्यामुळे असा अंदाज लावता येईल की, कंपनी सिक्युरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा देऊ शकते. समोर आलेल्या लीक्सनुसार या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.