April Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps

एक एप्रिल हा एक असा हक्काचा दिवस आहे ज्यादिवशी तुम्ही हमखास तुमच्या मित्र-मैत्रींणींंवर, जवळच्या व्यक्तीवर प्रॅंक खेळू शकता.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

April Fool Prank Apps: 1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल' (April Fool) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाबद्दल जगभरात अनेक कथा आहेत पण एक गोष्ट तुम्हांला या दिवशी जगभरात सगळी कडेच आढळेल ती म्हणजे 'प्रॅन्क'(Prank). या दिवशी हमखास तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती, मित्रमंडळी तुमचा 'पोपट' तर करणार नाही ना? याची काळजी घ्या. पण तुम्हांला तुमच्या मित्रांच्या नकळत त्यांना 'उल्लू' बनवायचं असेल तर काही मोबाईल अ‍ॅप्स (Apps) मदत करू शकतात. पहा कोणकोणत्या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही हमखास तुमच्या मित्रांना April Fool बनवू शकता.फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण!

April Fool करायला मदत करतील गूगल प्ले स्टोअरवरील ही धम्माल Prank Apps

1. The Fake Call & SMS

मित्रांना खोटा मेसेज किंवा कॉल करून थोडं घाबरावयचं असेल तर The Fake Call & SMS हे तुम्हांला मदत करू शकतं. तरूणाईमध्ये या अ‍ॅपची खास क्रेझ आहे.

अ‍ॅप ची साईझ: 5.5M

किती युजर्स वापरतात? 100,000+

आवश्यक Android: 4.0.3 and up

रेटिंग: 4.3 स्टार्स

2. Scary Prank

तुमच्या मित्रांना घाबरवायचं असेल तर तर हे Scary Prank हे अ‍ॅप तुम्हांला मदत करेल. केवळ तुम्हांला घाबरवायलाच नव्हे तर त्याचा व्हिडिओदेखील पाहण्याची सोय यामध्ये आहे. 'Call from hell', 'Guard to Phone', 'hell camera','Cute cat' यासारखे ऑप्शन्स आहेत.

याच्या मदतीने तुम्ही लोकांना एप्रिल फूल बनवू शकता.

अ‍ॅप ची साईझ: 7.4M

किती युजर्स वापरतात? 10,000+

आवश्यक Android:4.0 and up

रेटिंग: 3.7 स्टार्स

3. Face shift App

लोकांना चेहर्‍यांची अदलाबदल करून 'उल्लू' बनवायचं असेल तर हे अ‍ॅप मदत करतं. फोटो एडिटर प्रकारातील हे अ‍ॅप चेहरा बदलण्यासाठी आहे. संपूर्ण चेहरा शिफ्ट करण्यासाठी हे मदत करतं. यामध्ये स्टिकर्स, स्किन कलर, मॅचिंग फीचर, फोटो शेअरिंग फीचर्स आहेत.

अ‍ॅप ची साईझ: 9.1M

किती युजर्स वापरतात?1,000,000+

आवश्यक Android:4.1 and up

रेटिंग: 4.8 स्टार्स

4. Lie Detector

गूगल स्टोअरमधील Lie Detector हे एक गंमतीशीर अ‍ॅप आहे. यामध्ये तुम्ही खोटं बोलताय ? हे पटवून देऊ शकता. यामध्ये पहिलं लॉक ओपन झाल्यानंतर स्क्रीन ओपन होताच युजरचं फिंगर स्क्रिनिंग केलं जातं. मित्राला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारा आणि त्याच्या गंमतीशीर उत्तर पहा. प्रॅन्क करण्यासाठी हे अ‍ॅप फारच मस्त आहे.

अ‍ॅप ची साईझ: 8.5M

किती युजर्स वापरतात?10,000,000+

आवश्यक Android:4.4 and up

रेटिंग: 4.4 स्टार्स

5. Sound Prank

साऊंड प्रॅन्कमध्ये वेगवेगळे आवाज प्रीलोड आहेत. त्यामुळे तुमच्या मित्रांना फसवण्यासठी योग्य प्रसंग निवडून त्यामधील विविध आवाजांचा वापर करू शकता.

6. Dude, your car

तुमचा मित्र / मैत्रिण कार जीवापाड जपत असेल तर एक एप्रिल दिवशी त्यांना घाबरवायला हे अ‍ॅप नक्की मदत करू शकतं. यामध्ये कार अ‍ॅक्सिडंटचे काही फिल्टर्स वापरून तुम्ही कारला डॅमेज झालंय असं भासवू शकता. अवघ्या मिनिटाभरात केवळ फोटो एडिट वापरून तुम्ही हा प्रकार करू शकता.

अ‍ॅप ची साईझ:12M

किती युजर्स वापरतात?50,000+

आवश्यक Android:4.0 and up

रेटिंग: 3.2 स्टार्स

7. Ultra Voice Changer

मुलगा किंवा मुलगीच्या आवाजात, कलाकारांच्या आवाजात तुम्ही सहज काही रेकॉर्ड करून तुमच्या मित्रमैत्रिणींना फसवू शकता. त्यांची फिरकी घेण्यासाठी हे अ‍ॅप अत्यंत फायदेशीर आहे.

अ‍ॅप ची साईझ:6.3M

किती युजर्स वापरतात?5,000,000+

आवश्यक Android:5.0 and up

रेटिंग: 4.3 स्टार्स

8. BSOD simulator

स्मार्टफोनमध्ये या अ‍ॅपच्या मदतीने मुद्दामून काही एरर दाखवले जातात. यामुळे तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप बिघडलाय अशाप्रकारचे काही मेसेज दाखवले जातात. हे अ‍ॅप Blue Screen of Death error दाखवतात.

अ‍ॅप ची साईझ: 24M

किती युजर्स वापरतात? 500+

आवश्यक Android:4.1 and up

'एप्रिल फूल' मराठी मेसेज

April Fool 2020: एप्रिल फूल बनवण्याची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या माहिती : Watch Video

एक एप्रिल हा एक असा हक्काचा दिवस आहे ज्यादिवशी तुम्ही हमखास तुमच्या मित्र-मैत्रींणींंवर, जवळच्या व्यक्तीवर प्रॅंक खेळू शकता. पण यामध्ये मस्करीची कुस्करी होणार नाही. कुणाच्या जीवावर बेतेल अशा स्वरूपात प्रॅंक करू नका. तुम्ही मित्रांसोबत केलेली धम्माल आमच्यापर्यंतही नक्की पोहचवा.