अबब! रशियन कंपनीने बाजारात आणले तब्बल 48 लाखांचे Apple AirPods; जाणून घ्या काय आहे खास

कंपनीने यापूर्वी आयफोन मॉडेल्सपासून ते गोल्डन स्मार्टवॉचपर्यंत अनेक उपकरणे बाजारात आणली आहेत.

48 लाखांचे Apple AirPods

Apple ने नुकतेच मागील महिन्यात पुन्हा डिझाइन केलेले एअरपॉड्स (AirPods) बाजारात आणले आहेत. यावेळी कंपनीने रशियन लक्झरी गॅझेट निर्मात्यानी बनवेल्या मागील आवृत्तीमध्ये काही बदल करत, चक्क याचे सोन्याचे व्हर्जन सादर केले आहे. प्रीमियम उपकरणे आणि गॅझेटची लक्झरी मेकओव्हर करणारी कंपनी कॅव्हियरने (Caviar Global) हे Apple एअरपॉड्स तयार केले आहेत. कंपनीने याला चक्क 18 कॅरेट सोन्याच्या कव्हरने मढवले आहे. याचे केसही सोन्याचेच आहेत, ज्यावर कॅव्हियर बॅन्डिंग दिली गेली आहे. महत्वाचे म्हणजे या एअरपॉड्सची किंमत तब्बल 48 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

सोन्याच्या लेपमुळे याचे वजन मूळ डिझाइनपेक्षा थोडे जास्त आहे. कॅव्हियरने दावा केला आहे की, या एअरपॉड्सचा वपर करताना वापरकर्त्यास एक्स्ट्रा युनिक फिलिंग प्राप्त होईल. Apple च्या  एअरपॉड्समध्ये उत्कृष्ट ध्वनीसह, ध्वनी रद्द करणे अशी वैशिष्ट्ये आहेत. आता तर त्याचे अपग्रेड केलेले रूप देखील बाजारात आणले गेले आहेत. फर्स्ट जनरेशन Apple एअरपॉड्स त्याच्या चार्जिंग केससह 14,900 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. परंतु त्याच्या सोन्याच्या व्हर्जनची किंमत आवाक्याबाहेरील आहे. (हेही वाचा: Motorola Razr 2019 फोल्डेबल फोन लॉन्च, फिचर्स, किंमत यांबद्धल घ्या जाणून)

कॅव्हियरने आपल्या लक्झरी आणि हटके निर्मितीमुळे संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीने यापूर्वी आयफोन मॉडेल्सपासून ते गोल्डन स्मार्टवॉचपर्यंत अनेक उपकरणे बाजारात आणली आहेत. आता ऑल-व्हाइट एअरपॉड्सला गोल्डन टचसह सादर केले गेले आहे.