IPL Auction 2025 Live

सरकारकडून Sim Card वापरण्यासंबंधित नियमात बदल, जाणून घ्या अधिक

त्यानुसार, अधिकाधिक सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या नव्या नियमानुसार आता 9 पेक्षा अधिक सिम कार्ड ठेवणाऱ्या युजर्सला सिम कार्डचे वेरिफिकेशन करणे अनिवार्य असणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

दूरसंचार विभागाकडून (DoT) कडून बुधवारी एक नवा नियम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, अधिकाधिक सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या नव्या नियमानुसार आता 9 पेक्षा अधिक सिम कार्ड ठेवणाऱ्या युजर्सला सिम कार्डचे वेरिफिकेशन करणे अनिवार्य असणार आहे. परंतु जर सिमकार्ड वेरिफाय न झाल्यास ते बंद केले जाईल. तर जम्मू-कश्मीर आणि नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी सिम कार्डची संख्या सहा आहे. टेलिकॉम डिपार्टमेंटने टेलिकॉम कंपन्यांना त्या सर्व मोबाइल क्रमांक डेटाबेसमधून हटवण्यास सांगितले जे नियमाच्या नुसार वापर करत नाहीत.

टेलिकॉम विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, कस्टमर्सच्या ग्राहकांकडे परवानगी पेक्षा अधिक सिम कार्ड आढळल्यास त्यांना हवे ते सिम सुरु ठेवता येईल. परंतु अन्य सिम बंद करण्याचा त्यांना पर्याय दिला जाईल. याची मर्यादा 9 पेक्षा अधिक नसावी.(Twitter Safety Policy: युजर्सच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी प्रतिमा किंवा व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी; ट्विटरने आणले नवीन सुरक्षा धोरण)

टेलिकॉम कंपनीने असे म्हटले की, त्यांच्या द्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार ग्राहकांकडे सर्व टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्डाची मर्यादा ही अधिक असेल तर त्यांचे वेरिफिकेशन केले जाईल. टेलिकॉम विभागाने हे पाऊल गुन्हे, आपत्तीजनक फोन किंवा फसवणूकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी उचलले आहे.(Amazon वरून अंमली पदार्थांची तस्करी; व्हॅन चालक आणि दोन पिकअप बॉयकडून जप्त केला 48 किलो गांजा)

DoT ने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला आदेश दिले आहे की, ज्या युजर्सकडे 9 पेक्षा अधिक सिम कार्ड असल्यास त्यांना नोटिफिकेशन पाठवले जाईल. अशातच सिम कार्डचे आउटगोईंग कॉल सुद्धा 30 दिवसांमध्ये बंद केले जातील. तर इनकमिंग कॉल 45 दिवसांच्या आतमध्ये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मोबाइल सिम युदर्जकडे अधिक सिम सरेंडर करण्याचे सुद्धा ऑप्शन असणार आहे.