KYC किंवा Aadhaar अपडेटच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक; Reliance Jio चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा

ऑनलॉईन फ्रॉडर्स नेहमीच युजर्संना गंडा घातल असतात. ही फसवणूक बँकेपर्यंत मर्यादीत राहिलेली नाही.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये (Coronavirus Lockdown) ऑनलाईन व्यवहारांसोबतच ऑनलाईन फसवणूकीचे (Online Fraud) प्रमाणही वाढले. ऑनलॉईन फ्रॉडर्स नेहमीच युजर्संना गंडा घालत असतात. ही फसवणूक बँकेपर्यंत मर्यादीत राहिलेली नाही. तर आता सिम डिटेल्स अपडेटच्या नावाने देखील फसवणूक होऊ लागली आहे. फ्रॉडर्स KYC किंवा आधार डिटेल्स (Aadhar Details) अपडेट करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना याबद्दल सतर्क करत आहेत. अलिकडेच एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडीयाने (Vodafone Idea) आपल्या ग्राहकांना याबद्दल सूचना दिल्या होत्या. आता रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्संना सतर्क केले आहे.

वैयक्तिक माहिती मागणाऱ्या फोन कॉल्स आणि मेसेजवर कोणतीही प्रतिक्रीया देऊ नका, असे रिलायन्स जिओने मेसेज पाठवून आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे. तसंच कोणाही सोबत आपली वैयक्तिक माहिती शेअर करु नका असे म्हटले आहे. (Reliance Jio ने सादर केले '5' नवीन प्रीपेड प्लॅन्स; येथे पहा डिटेल्स)

रिलायन्स जिओने आपल्या मेसेजमध्ये म्हटले की, फसवणूकीच्या उद्देशाने पाठवण्यात आलेल्या मेसेजपासून सावध रहा. व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कोणत्याही नंबरवरुन कॉल करुन किंवा KYC/Aadhaar अपडेट करण्याच्या नावाने कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक केली जात आहे. जिओने अशा कोणत्याही प्रकारच्या कामासाठी थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करण्यास सांगत नाही. कृपया अशाप्रकारच्या एसएमएस किंवा कॉलपासून सतर्क रहा. यापासून आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे. सुरक्षित रहा. टीम Jio.

यापूर्वी देखील कंपनीकडून युजर्संना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करण्यास सांगितल्यास करु नका. फोन कॉलवर KYC/Aadhar अपडेट करण्यासाठी वैयक्तिक माहिती मागितल्यास पुरवू नका. Aadhar किंवा इतर कोणतीही माहिती हवी असल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif