Zoom ला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ लवकरच लॉन्च करणार Jio Meet
हे अॅप Zoom, Google Meet, Hangout, Duo सारख्या व्हिडिओ सारख्या कॉलिंग अॅपला टक्कर देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
रिलान्स जिओ लवकरच त्यांचे व्हिडिओ कॉलिंग अॅप Jio Meet लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. हे अॅप Zoom, Google Meet, Hangout, Duo सारख्या व्हिडिओ सारख्या कॉलिंग अॅपला टक्कर देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओबरोबर भागीदारी केली आहे.जिओ मीट कॉलिंग अॅप लॉन्च करण्यामागे एक कारण असू शकते. त्यानुसार देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असून सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच व्हिडिओ कॉलिंगचा वापर अधिक वाढवणे हा मुख्य उद्देश्य असू शकतो. व्हिडिओ कॉलिंगचा वापर अधिक वाढल्यास झूम सारख्या व्हिडिओ कॉलिंगला रिलायन्स जिओचे हे अॅप टक्कर देणारे ठरु शकते.
अन्य व्हिडिओ कॉलिंग अॅपसारखेच जिओ मीट सुद्धा Android,iOs आणि Web प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करता येणार आहे. jioMee.Com या वेबपेजवर कंपनीने लाईव्ह सुद्धा केले होते. दरम्यान जिओ मीट व्यावसायिकरित्या लॉन्च केले जाणार का याबबात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या अॅपच्या माध्यमातून युजर्सला HD व्हिडिओ कॉलिंगची मजा घेता येणार आहे. यामध्ये एकाचवेळी 5 जण जोडले जाऊ शकतात.(JioMart ने व्हॉट्सअॅपवर सुरु केली Online Shopping ची चाचणी; नवी मुंबई, ठाणे व कल्याण येथे सुविधा उपलब्ध, जाणून घ्या कशी द्यावी ऑर्डर)
गेल्या महिन्यात Zoom व्हिडिओ कॉलिंगच्या सिक्युरिटी संदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. तसेच केंद्र सरकारने ही झुप व्हिडिओ कॉलिंग सुरक्षित नसल्याचे म्हटले होते.त्यानंतर झुप कंपनीने त्यांच्या युजर्सची सुरक्षितता लक्षात घेता सिक्युरिटी अपडेट रोलआउट केले होते. झुम व्यतिरिक्त गुगलने त्यांचा Meet प्रीमियम व्हिडिओ कॉलिंग अॅप युजर्ससाठी फ्री करुन दिला आहे.
Jio Infocomm चे सिनियर वाइस प्रेसिडंट पंकज पवार यांनी असे म्हटले आहे की, जिओ मीट अॅप भारतात लॉन्च करण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स अत्यंत सुरक्षित वातावरणासह अगदी सोप्य पद्धतीने याचा वापर करु शकणार आहेत. जिओ मीट हे अॅप आहे जे कोणत्याही डिवाइसवर काम करु शकते.