Reliance Jio चे सर्वात बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज युजर्सला मिळणार 2GB डेटा
तर डिसेंबर 2019 मध्ये टॅरिफ दरात वाढ झाल्यानंतर प्रीपेड प्लॅन सुद्धा बदलले आहेत. कंपनीने त्यांच्या प्लॅनच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
रिलायन्स जिओ त्यांच्या युजर्सला नेहमीच बेस्ट प्रीपेड प्लॅन उपलब्ध करुन देतात. तर डिसेंबर 2019 मध्ये टॅरिफ दरात वाढ झाल्यानंतर प्रीपेड प्लॅन सुद्धा बदलले आहेत. कंपनीने त्यांच्या प्लॅनच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मात्र युजर्सला प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर अधिक बेनिफिट्स आणि डेटा प्लॅनची सुविधा पूर्वी पेक्षा उत्तम देण्यात आली आहे. परंतु युजर्सला हे नवे प्रीपेड प्लॅन पसंत नसल्याचे समोर आले आहेत. त्यासाठीच आम्ही तुम्हाला रिलायन्सचे काही बेस्ट प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत.जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत युजर्सला जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तसेच 2GB डेटा सुद्धा मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ऑफनेट कॉलिंगसाठी युजर्सला 129 मिनिट IUC मिनिट्स ऑफर करण्यात येणार आहेत. दरम्यान युजर्सला 10 रुपयांचा टॉप-अप प्लॅन खरेदी करावा लागणार आहे.
>>जिओच्या 333 रुपयांच्या प्लॅन 28 दिवसांचा असून जिओ टू जिओ फ्री कॉलिंग करता येणार आहे. तसेच प्रत्येक दिवसाला 2GB डेटा देण्यात येणार आहे. तर जिओ टू जिओ महिन्याभरासाठी 1 हजार मिनिटे मिळणार आहेत.
>>जिओच्या 444 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 3 महिने असणार आहे. त्यामध्ये युजर्सला 2GB डेटा देण्यात येणार असून जिओ टू जिओ फ्री कॉलिंग असणार आहे. मात्र नॉन जिओसाठी 1 हजार मिनिटे दिली जाणार आहेत.(Jio युजर्सला झटका, आता दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी युजर्सला मोजावे लागणार पैसे)
कंपनीने असे सांगितले आहे की, या प्लॅनअंतर्गत SMS आणि अॅपसाठी सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. जिओच्या सध्याच्या प्लॅनची नव्या प्लॅनसोबत तुलना केल्यास यामध्ये अधिक डेटा देण्यात येणार आहे. कंपनीने असे ही सांगितले आहे की युजर्सचे या प्लॅनमध्ये 80 रुपये वाचवणार आहेत. परंतु जर तुम्ही नॉन जिओवर 1 हजार मिनिटांपेक्षा अधिक वेळा कॉल केल्यास तुम्हाला पुन्हा IUC टॉप अप प्लॅनचा रिचार्ज करावा लागणार आहे.