Reliance Jio युजर्सला मोठा दिलासा, पुन्हा आले 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन
रिलायन्स जिओने (Reliance Jio) पुन्हा एकदा ग्राहांना दिलासा दिला आहे. तर एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी अन्य नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिल्यानंतर आता जिओने ही त्यांचे 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन पुन्हा आणले आहेत.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) पुन्हा एकदा ग्राहांना दिलासा दिला आहे. तर एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी अन्य नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिल्यानंतर आता जिओने ही त्यांचे 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन पुन्हा आणले आहेत. कंपनीकडूनन टॅरिफचे दर वाढवल्यानंतर डेटा सुद्धा महाग झाले होते. त्याचसोबत फ्री अनलिमिटेड कॉलिंगवर FUP लिमिट लावल्याने युजर्समध्ये निराशा दिसून आली. यामुळेच कंपनीने त्यांच्या प्लॅनध्ये बदल करत आहे.
तर टॅरिफ दर वाढवल्यानंतर जिओने युजर्सला 1 जीबी डेटा मिळणारे प्लॅन बंद केले. यामुळे बहुतांश युजर्सला कंपनीचा हा निर्णय पटला नागी. मात्र आता कंपनीने युजर्सची गरज लक्षात घेता पुन्हा एकदा 149 रुपयांचा प्लॅन सुरु केला आहे. यामध्ये 24 जीबी डेटासह 24 दिवसांची वॅलिटीडी असणार आहे. तसेच 100 फ्री एसएमएस आणि जिओ-टू-जिओ फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी यामध्ये 300 एफयुपी मिनिट्स मिळणार आहेत. याचसोबत रिलयान्सच्या जिओ अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.(Idea- Vodaphone ग्राहकांसाठी खुशखबर; आता दुसऱ्या नेटवर्कवरही मिळणार Unlimited फ्री कॉलिंग)
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2019 10:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

