Reliance Jio 5G Network: भारतामधील 100 हून अधिक शहरांमध्ये पोहोचली 5जी सेवा; जाणून घ्या महाराष्ट्रात कुठे सुरु आहे

मागच्या आठवड्यात सोमवारी आग्रा, कानपूर, मेरठ, प्रयागराज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिशूर, नागपूर आणि अहमदनगर जे जिओच्या ट्रू 5G नेटवर्कमध्ये सामील झाले.

5G internet | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये 2022 मध्ये 5G नेटवर्क सुरु झाले व आता देशभरात या 5G नेटवर्कची तैनाती जोरात सुरू आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) या सगळ्यात आघाडीवर आहे पण एअरटेलही या बाबतीत मागे नाही. रिलायन्स जिओ 2023 पर्यंत भारतातील सर्व शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु करण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल असे दिसते. सध्या 100 हून अधिक शहरांमध्ये जिओ स्टँडअलोन 5G नेटवर्कसह आधीच लाइव्ह आहे आणि अधिक शहरी भागात त्याचा विस्तार करण्यावर ते काम करत आहे.

अलीकडे, कंपनीने छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमधील शहरांमध्ये 5G कव्हरेज विस्तारित केले आहे. Jio True 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी आता रायपूर, दुर्ग, भिलाई, बिहार, पाटणा, मुझफ्फरपूर, रांची, जमशेदपूर, बिजापूर, उडुपी, कलबुर्गी, बेल्लारी, ओडिशा, राउरकेला, ब्रह्मपूर येथे सुरु झाली आहे. यासह केरळमधील कोल्लम, आंध्र प्रदेशमधील एलुरू आणि महाराष्ट्रातील अमरावतीचाही यामध्ये समावेश आहे.

मागच्या आठवड्यात सोमवारी आग्रा, कानपूर, मेरठ, प्रयागराज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिशूर, नागपूर आणि अहमदनगर जे जिओच्या ट्रू 5G नेटवर्कमध्ये सामील झाले. यापैकी बहुतेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ ही पहिली आणि एकमेव सेवा प्रदाता बनली आहे. या 10 शहरांमध्ये, जिओ वापरकर्त्यांना 'जिओ वेलकम ऑफर' अंतर्गत आमंत्रित केले गेले. निमंत्रित जिओ वापरकर्त्यांना 9 जानेवारीपासून 1 Gbps+ स्पीड आणि अमर्यादित डेटा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळू लागला आहे. (हेही वाचा: Samsung Galaxy S23: सॅमसंगच्या सर्वात पॉवरफुल फोनचे डिटेल्स आले समोर; लॉन्चपासून किंमतीपर्यंत सर्व काही जाणून घ्या)

जिओने सांगितले की, ज्या शहरांमध्ये त्यांनी 5G लाँच केले आहे, ती पर्यटन आणि व्यवसाय स्थळांव्यतिरिक्त आपल्या देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे आहेत. कंपनीने म्हटले आहे की जिओच्या 5G सेवा लाँच केल्यामुळे, या क्षेत्रातील वापरकर्त्यांना सर्वोत्कृष्ट दूरसंचार नेटवर्क, ई-गव्हर्नन्स, शिक्षण, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि SME क्षेत्रात विकासाच्या संधी मिळतील. सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नागपूर, अमरावती, अहमदनगर या 7 शहरांमध्ये 5जी सेवा सुरु आहे.