Samsung Galaxy S23: सॅमसंगच्या सर्वात पॉवरफुल फोनचे डिटेल्स आले समोर; लॉन्चपासून किंमतीपर्यंत सर्व काही जाणून घ्या
Samsung Galaxy S23 (PC - 91mobiles.com)

Samsung Galaxy S23: स्मार्टफोन ब्रँड Samsung लवकरच आपली नवीन Samsung Galaxy S23 सीरीज भारतात लॉन्च करणार आहे. भारतात लॉन्च होण्याआधीच या मालिकेचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. Samsung Galaxy S23 सीरीजचे फोन सॅमसंग इंडिया वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकतात. Galaxy Unpacked इव्हेंट 2023 1 फेब्रुवारी 2023 रोजी होईल, ज्यामध्ये Samsung Galaxy S23 मालिका लॉन्च केली जाईल. यात Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra फोन या सीरीज अंतर्गत लॉन्च केले जातील. याआधीही, सॅमसंगने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट आयोजित केला आहे. नवीन फोन सीरीज लॉन्च होण्याआधीच त्याची माहिती समोर आली आहे. असा दावा केला जात आहे की, Galaxy S23 सीरीजच्या सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि तीन रियर कॅमेरे मिळतील.

Galaxy Unpacked 2023

Galaxy Unpacked इव्हेंट 2023 1 फेब्रुवारी 2023 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे IST रात्री 11:30 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचे सॅमसंगच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण केले जाईल. Galaxy S23 मालिकेसह, Samsung ने अंतिम प्रीमियम अनुभवाचे वचन दिले आहे. Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसह ऑफर केले जातील. (हेही वाचा - Amazon Great Republic Day Sale: अॅमेझॉनचा नव्या वर्षातील पहिला बंपर सेल; जाणून घ्या सेलची Date, Duration आणि Offer)

Samsung Galaxy S23 ची वैशिष्ट्य -

Galaxy S23 मालिकेतील सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन रियर कॅमेरे मिळतील. तर Galaxy S23 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह चार मागील कॅमेरे मिळू शकतात. Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते, तर Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेजमध्ये मिशू शकते.

Galaxy S23 आणि Galaxy S23 Ultra हे बोटॅनिक ग्रीन, कॉटन फ्लॉवर, मिस्टी लिलाक आणि फॅंटम ब्लॅक शेड्समध्ये ऑफर केले जाऊ शकतात. असे बोलले जात आहे की सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरीजच्या फोनच्या किंमती Galaxy S22 सीरीज सारख्याच असतील. Galaxy S23 मालिका 5,000mAh बॅटरीने सुसज्ज असू शकते. त्याच वेळी, सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीज फोनचे वजन सुमारे 228 ग्रॅम असण्याची शक्यता आहे.

बुकिंग सुरु -

Samsung Galaxy S23 सीरीजचे फोन सॅमसंग इंडिया वेबसाइटवरून 1,999 रुपयांमध्ये बुक केले जाऊ शकतात. विक्री सुरू झाल्यानंतर प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी Rs 5,000 पर्यंतचे फायदे मिळू शकतात.