Redmi Raining 9s on Flipkart: रेडमीच्या 9 सीरिजच्या 'या' स्मार्टफोन्सची 2 ते 7 मे दरम्यान फ्लिपकार्टवर होणार बरसात, वाचा सविस्तर
Redmi Note 9 ची किंमत 10,999 रुपये, Redmi 9 Prime किंमत 9,499 रुपये, Redmi 9 Power किंमत 9,999 रुपये आणि Redmi 9i ची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होते.
स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) ने रेडमीच्या 9 सीरिजच्या जबरदस्त स्मार्टफोन्सची ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart India) बरसात करणार आहे. भारतामध्ये 2 मे ते 7 मे दरम्यान Redmi 9i, Redmi 9 Power,Redmi Note 9 आणि Redmi 9 Prime या स्मार्टफोन्सचा विशेष सेल ठेवला आहे. Redmi Note 9 ची किंमत 10,999 रुपये, Redmi 9 Prime किंमत 9,499 रुपये, Redmi 9 Power किंमत 9,999 रुपये आणि Redmi 9i ची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होते.
Redmi Note 9 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 6.53 इंचाचा FHD+ punch-hole डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके आहे. यात MediaTek Helio G85 SoC हा प्रोसेसर दिला असून 6GB रॅम आओणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. रेडमी नोट 9 मध्ये 4GB आणि 64GB, 4GB आणि 128GB तसेच 6GB आणि 128GB असे तीन पर्याय आहेत.हेदेखील वाचा- Xiaomi ने भारतात लाँच केला iPhone ला टक्कर देणारा Mi 11 Ultra स्मार्टफोन, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Redmi 9 Prime मध्ये 4GB+64GB स्टोरेज आणि 6GB+128GB असे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. अॅन्ड्रॉइड 10 OS वर आधारित हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 प्रोसेसरवर काम करणार आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 5020mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये युजर्सला एआय क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे.
Redmi 9 Power मध्ये 6.53 इंचाची पुर्ण HD+ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सुद्धा दिले आहे. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह येतो. यात 6GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, याक 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा एक आणि 2MP चा दोन सेंसर दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Redmi 9i मध्ये 6.53 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. तसंच यात MediaTek Helio G25 चिपसेट प्रोसेसर असून 4GB रॅमसह 128GB चा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 13MP चा कॅमेरा दिला असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा सेल्फी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ती रंगात उपलब्द आहे- मीडनाईट ब्लॅक (Midnight Black),सी ब्लू (Sea Blue) आणि नेचर ग्रीन (Nature Green).
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)