Redmi 9i Smartphone Launched in India (Photo Credits: Redmi India)

रेडमी 9i (Redmi 9i) चा आज पुन्हा एकदा सेल आहे. दुपारी 12 पासून हा सेल फ्लिपकार्ट (Flipkart) आणि एमआयच्या (Mi.com) अधिकृत वेबसाईटवर सुरु होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला होता. रेडमी 9 सिरीज मध्ये रेडमी 9 आणि रेडमी 9A हे दोन स्मार्टफोन्स होते. त्यानंतर आता रेडमी 9i ची भर पडली आहे. या सेलअंतर्गत रेडमी 9i या स्मार्टफोनवर 1700 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. तसंच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर (Flipkart Axis Bank Credit Cards) 5% अनलिमिडेट कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर (Axis Bank Buzz Credit Cards) 5% सूट दिली जात आहे. त्याचबरोबर नो-कॉस्ट ईएमआय (no-cost EMI) आणि स्टँडर्ड ईएमआयचा (Standard EMI) पर्यायही दिला जात आहे.

रेडमी 9i या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. तसंच यात MediaTek Helio G25 चिपसेट प्रोसेसर असून 4GB रॅमसह 128GB चा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ:

फोटोग्राफीसाठी यात 13MP चा कॅमेरा दिला असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा सेल्फी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ती रंगात उपलब्द आहे- मीडनाईट ब्लॅक (Midnight Black),सी ब्लू (Sea Blue) आणि नेचर ग्रीन (Nature Green).

Redmi 9i Smartphone Launched in India (Photo Credits: Redmi India)
Redmi 9i Smartphone Launched in India (Photo Credits: Redmi India)

रेडमीच्या या स्मार्टफोनचे दोन वेरिएंट उपलब्ध आहेत- 4GB + 64GB आणि 4GB + 128GB. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 बेस्ड MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Redmi 9i India Launch (Photo Credits: Flipkart)

कनेक्टीव्हीसाठी या स्मार्टफोनमध्ये VoWiFi, 4G, VoLTE, Bluetooth 5.0, GPS/A-GPS आणि micro-USB पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. रेडमी 9i च्या 4GB & 64GB वेरिएंटची किंमत 8,299 रुपये असून 4GB & 128GB ची किंमत 9,299 इतकी आहे.