Redmi Note 9 Pro स्मार्टफोनसाठी आज दुसरा सेल, ग्राहकांना खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट

हा सेल अॅमेझॉन आणि Mi India च्या वेबसाईटवर दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

Redmi note 9 pro (Photo Credits-Twitter)

रेडमी नोट 9 प्रो स्मार्टफोनसाठी आज पासून दुसरा सेल सुरु होणार आहे. हा सेल अॅमेझॉन आणि Mi India च्या वेबसाईटवर दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. गेल्या आठवड्यातच रेडमी नोट 9 प्रो स्मार्टफोनचा पहिला सेल होता. त्यामुळे ज्या ग्राहकांना गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन खरेदी करता आला नाही त्यांच्याकडे आज संधी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मार्च महिन्यात लॉन्च केला होता. रेडमी नोट 9 प्रो ब्लू, ब्लॅक आणि सफेद रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

रेडमी नोट 9 प्रो 4 जीबी+64 जीबी असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 13,99 रुपये आणि 6जीबी+128जीबी असणाऱ्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 16,999 रुपये मोजावे लागणार आहेत. फोन खरेदी केल्यावर ICICI बँक क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 1 हजार रुपयापर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच EMI चा ऑप्शन सुद्धा ग्राहकांना देण्यात येणार आहे. ऐवढेत नव्हे तर एअरटेल ग्राहकांना 298 किंवा 398 रुपयांच्या पॅकवर डबल मिळणार आहे.(Xiaomi कंपनीने लॉन्च केला 108MP कॅमेरा असलेला Mi10 स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

रेडमी नोट 9 प्रो स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6,7 इंच फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे Resulation 1080X2400 पिक्सल आहे. ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरवर हा स्मार्टफोन काम करणार आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच 8 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्श सेंसर सुद्धा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणाऱ्या 5020mAh बॅटरीसह येणार आहे.