Flipkart Smartphone Carnival Sale: फ्लिपकार्ट सेलचा आज शेवटचा दिवस, Realme 7 Pro वर मिळत आहे जबरदस्त सूट; जाणून घ्या नवीन किंमत आणि ऑफर्स
Realme 7 Pro वर ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहेत.
Flipkart Smartphone Carnival Sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने 8 मार्च रोजी स्मार्टफोन कार्निव्हल विक्रीची (Smartphone carnival Sale) घोषणा केली. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. 12 मार्च म्हणजेच आज या सेलमध्ये बऱ्याच आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निव्हल सेलमध्ये (Flipkart Smartphone Carnival Sale) तुम्हाला बर्याच ब्रँडच्या स्मार्टफोनवर सूट मिळेल. जर तुम्हाला अद्याप या सेलचा लाभ घेता आला नसेल तर आजची शेवटची संधी आहे. या सेलमध्ये Realme 7 Pro स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. चला मग Realme 7 Pro वरील सवलत आणि ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
कमी किंमतीत खरेदी कर Realme 7 Pro -
Realme 7 Pro स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात 19,999 रुपयांच्या किंमतीत बाजारात लाँच करण्यात आला. हा फोन फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निवल सेलमध्ये 18,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. ही किंमत त्याच्या 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. त्याचबरोबर, तुम्ही 8 जीबी + 128 जीबी मॉडेल 20,990 रुपयांना 1,000 रुपयांच्या सूटवर खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 21,990 रुपये आहे.
फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निव्हल सेल अंतर्गत, Realme 7 Pro वर वापरकर्ते बर्याच मोठ्या ऑफर्स मिळवू शकतात. Realme 7 Pro वर ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहेत. याशिवाय तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची इन्स्टंट सूट मिळू शकते. (वाचा - Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)
Realme 7 Pro चे फिचर्स -
Realme 7 Pro मध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे 1,080x2,400 पिक्सल स्क्रीन रिझोल्यूशन आहे. अँड्रॉइड 10 ओएसवर आधारित, हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसरवर कार्य करतो. मेमरी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढविण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
Realme 7 Pro च्या मागील पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 एमपीचा सोनी आयएमएक्स 682 प्राइमरी सेन्सर आहे. यात 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मोनोक्रोम सेन्सर आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स असतील. तर 32 एमपी कॅमेरा सेल्फीसाठी फोनच्या पुढच्या पॅनेलवर उपलब्ध असेल. पॉवर बॅकअपसाठी, यात 4,500mAh ची बॅटरी आहे, जी 65 डब्ल्यू सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.