PUBG चा नवा गेम New State 'या' दिवशी भारतात होणार लॉन्च

पबजी चा न्यू स्टेट हा नवीन गेम 11 नोव्हेंबर रोजी रिलीझ होणार असल्याची घोषणा क्राफ्टनने शुक्रवारी त्याच्या प्रदर्शन कार्यक्रमादरम्यान केली.

PUBG's New Game New State (Photo Credits: Facebook)

पबजी (PUBG) चा न्यू स्टेट (New State) हा नवीन गेम 11 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार असल्याची घोषणा क्राफ्टनने (Krafton) शुक्रवारी प्रदर्शन कार्यक्रमादरम्यान केली. नवीन मोबाईल गेम 200 हून अधिक देशांमध्ये Android आणि iOS वर रिलीज केला जाईल, असे कंपनीने सांगितले. भारतासह 28 देशांमध्ये या गेमची तांत्रिक चाचणी (Technical Test) 29-30 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल. (PUBG: आता पब्जी फक्त 3 तासच खेळता येणार, 'या' देशाने लावले नवे निर्बंध)

पबजी - न्यू स्टेट ची घोषणा फेब्रुवारीमध्ये झाली होती. तेव्हापासून Android आणि iOS वर 50 दशलक्षाहून अधिक पूर्व-नोंदणी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. च्या गेमघोषणेनंतर जागतिक पातळीवर खेळाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु भारतात नोंदणी प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू झाली.

पबजी - न्यू स्टेट जागतिक स्तरावर 17 भिन्न भाषांमध्ये विनामूल्य-टू-प्ले मोबाईल गेम म्हणून पदार्पण करेल, असे क्राफ्टनने YouTube वर प्रक्षेपित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.

पुढील आठवड्यात पबजी - न्यू स्टेट ची अंतिम तांत्रिक चाचणी 28 देशांमध्ये आयोजित केली जाईल, यामध्ये भारतासह बहरीन, कंबोडिया, इजिप्त, हाँगकाँग, इंडोनेशिया, इराक, जपान, जॉर्डन, कोरिया, कुवैत, लाओस, लेबनॉन, मकाओ, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, ओमान, फिलीपिन्स, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, थायलंड, तुर्की, यूएई आणि येमेन या देशांचा समावेश असेल.

पबजी - न्यू स्टेट मोबाईल डिव्हाईसवर नेक्स्ट जनरेशन बॅटल रॉयल अनुभव आणेल ज्यामध्ये सर्व-नवीन तंत्रज्ञान आणि गनप्ले सिस्टीम समाविष्ट असेल. या गेममध्ये प्रगत ग्राफिक्स देखील असतील. पबजी बॅटलग्राउंड्स प्रमाणे, पबजी न्यू स्टेट सुद्धा पबजी स्टुडिओद्वारे विकसित केला जाईल. त्यात नवीन मॅप्स आणि सुधारित गेमप्लेचा समावेश असेल.