Portronics ने भारतात लॉन्च केले Bluetooth Receiver आणि Transmitter Adaptor, जाणून घ्या खासियत

या अॅडॉप्टरचा वापर करत युजर्सला टीव्ही, सीडी प्लेअरसह जुने पीसी, वायरलेस हेडफोन, स्पीकर आणि कारच्या स्टिरिओ सिस्टम सोबत अगदी सोप्प्या पद्धतीने ऑडिओ इनपुटला ब्रॉडकास्ट करता येणार आहे.

Portronics 'Auto 14' (Photo Credits-Twitter)

डिजिटल आणि पोर्टेबल कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधील दिग्गज Portronics यांनी भारतीय मार्केटमध्ये Auto 14 ब्लूटुथ रिसिव्हर आणि ट्रान्समिटर अॅडॉप्टर लॉन्च केले आहे. या अॅडॉप्टरचा वापर करत युजर्सला टीव्ही, सीडी प्लेअरसह जुने पीसी, वायरलेस हेडफोन, स्पीकर आणि कारच्या स्टिरिओ सिस्टम सोबत अगदी सोप्प्या पद्धतीने ऑडिओ इनपुटला ब्रॉडकास्ट करता येणार आहे. खासियत म्हणजचे या डिवाइसच्या माध्यमातून तुम्ही जुने आणि महागडे नॉन ब्लूटुथ डिवाइसेसचा ही वापर करता येणार आहे.(Realme C15 Qualcomm Edition भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स)

Portronics 'Auto 14' ब्लूटुथ रिसिव्हर अॅन्ड ट्रान्समिशन अॅडॉप्टरच्या किंमती बद्दल बोलायचे झाली तो तुम्हाला 1999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. युजर्सला ते ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने ही खरेदी करता येणार आहे. हे डिवाइस फक्त ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कंपनीच्या या ब्लूटुथ रिसिव्हर आणि ट्रान्समिशन अॅडॉप्टरच्या फिचर्स बद्दल सांगायचे झाल्यास ते वायरलेस डिवाइस आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला एखादा कंटेट नॉन-ब्लुटूथ डिवाइसेस मधून ब्लूटुथ हेडफोन आणि स्पीकरमध्ये ऑडिओ स्ट्रिम करता येणार आहे. तर रिसिव्हिंग मोड तुमच्या पसंदीचे मीडिया प्लेअर मधून ऑडिओ तुम्हाला वायर्ड-स्पीकर, हेडफोन, कार स्टेरिओ सिस्टम, होम थिएटरमध्ये स्ट्रिम करणार आहे.(हेडफोन्स आणि स्पीकर्स साठी प्रसिद्ध असलेली कंपनी बोट ने लाँच केले जबरदस्त boAt Storm स्मार्टवॉच, 'या' दिवशी होणार फ्लिपकार्टवर विक्री)

ब्लुटूथ रिसिव्हर आणि ट्रान्समिशन अॅडॉप्टरबद्दल कंपनीने असा दावा केला आहे की, हा वायरलेस अॅडॉप्टर उत्तम कनेक्शनसह शानदार ऑडिओ कनेक्टिव्हिटी आणि एचडी गुणवत्ता देणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लुटूथ 4.2 तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच यासाठी कमी पॉवर ही लागते. पॉवर बॅकअपसाठी Auto 14 मध्ये 450mAh ची शानदार रिचार्जेबल बॅटरी दिली गेली आहे. जी 2 तासात रॅपिड चार्जिंगसह चार्ज करता येणार आहे. एकाच वेळी हे डिवाइस तुम्हाला 1 तासांसाठी प्लेटाइम देणार आहे.