POCO M2 स्मार्टफोन येत्या 8 सप्टेंबरला होणार भारतात लॉन्च, जाणून घ्या संभावित किंमत

POCO M2 स्मार्टफोन येत्या 8 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. त्याचसोबत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने सुद्धा अपकमिंग स्मार्टफोन POCO M2 चा टीझर लॉन्च केला आहे.

POCO M2 Smartphone (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी POCO यांचा नवा डिवाइस POCO M2 स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. POCO M2 स्मार्टफोन येत्या 8 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. त्याचसोबत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने सुद्धा अपकमिंग स्मार्टफोन POCO M2 चा टीझर लॉन्च केला आहे. यापूर्वी कंपनीने POCO M2 Pro बाजारात उतरवला होता.(10MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन Mi10 फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स)

POCO M2 स्मार्टफोनचे लॉन्चिंग येत्या 8 सप्टेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत YouTube वर लाईव्ह पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, POCO M2 स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपये असू शकते. तसेच स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल अद्याप खुलासा केलेला नाही. परंतु येत्या काही दिवसात कंपनी याच्या फिचर्स बद्दल खुलासा करु शकते.(Oppo A53 2020 Launched in India: ओप्पो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो ए53 2020 भारतात लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून)

कंपनीने जुलैच्या सुरुवातील POCO M2 Pro स्मार्टफोन उतरवला होता. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम+64GB स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB रॅम+64GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे.तर 6GB+128GB मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास POCO M2 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. त्याचा रेजोल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. या स्मार्टफोनसाठी Snapdragon 720G प्रोसेसर दिला आहे. या व्यतिरिक्त युजर्सला डिवाईसमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल, 5MP चे मॅक्रो शूटर आणि 2MP चे डेप्थ सेंसर दिला आहे. त्याचसोबत फोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी 16MP कॅमेरा दिला आहे. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने पोको एम2 प्रो 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी Wifi, ब्लूटूथ, जीपीएस युएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फिचर्स दिले आहेत.