Poco M2 Reloaded भारतात झाला लाँच, 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असलेल्या या स्मार्टफोनची काय आहेत खास वैशिष्ट्ये
Poco M2 Reloaded स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे.
पोकोचा नवा स्मार्टफोन Poco M2 Reloaded आज अखेर भारतात लाँच झाला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून 10,000 रुपये किंमतीच्या आत येणा-या या स्मार्टफोनमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज दुपारी 3 वाजल्यापासून हा स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच झालेल्या Poco M2 स्मार्टफोनचा हा अपडेटेट व्हर्जन आहे. Poco M2 Reloaded स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये इतकी आहे.
Poco M2 Reloaded स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 2 रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यातक 6.53 इंचाची FHD+ डिस्प्ले मिळते, जी वॉटरड्रॉप नॉचसह येते. या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आला आहे.हेदेखील वाचा- WhatsApp Pink Installation Link चे मेसेजेस Malware!सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? घ्या जाणून
या स्मार्टफोनमध्ये 64GB चे स्टोरेज मिळते, जे तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. हा मिडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसर मिळतो. हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित MIUI 12 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP चा मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर मिळतो. यात 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळते.
Poco M2 Reloaded मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G LTE, ड्युल बँड वाय-फाय, ब्लूटुथ 5.0, IR Blaster, जीपीएस आणि युएसबी टाईप-सी पोर्टसुद्धा येतो. हा फोनमध्ये माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. थोडक्यात किंमतीच्या तुलनेत या स्मार्टफोनमध्ये खूपच खास आणि आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हा स्मार्टफोन या किंमतीतील बाजारातील अन्य ब्रँडच्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देईल.