भारतात 'Oppo A15s ' स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि खास ऑफर्स
ओप्पो ए 15 ची किंमत 11,490 रुपये आहे. ओप्पोचे हे मोडेल भारतात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये सादर करण्यात आले आहे.
Oppo A15s: ओप्पो ए 15 च्या प्रतीक्षेत असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण, Oppo A15s हा स्मार्टफोन भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि थ्रीडी वक्र बॉडीसह या स्मार्टफोनमध्ये युजर्सना एकच स्टोरेज व्हेरिएंट मिळणार आहे. ग्राहकांना हे डायनॅमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि रॅम्बो सिल्व्हर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. ही कंपनीच्या ओप्पो ए 15 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे, जी नवीनतम वैशिष्ट्यांसह सज्ज आहे.
Oppo A15s किंमत आणि ऑफर्स -
ओप्पो ए 15 ची किंमत 11,490 रुपये आहे. ओप्पोचे हे मोडेल भारतात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये सादर करण्यात आले आहे. वापरकर्त्यांना आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक आणि झेस्ट मनी कार्ड कडून किरकोळ स्टोअरमधून हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर 5% कॅशबॅक देण्यात येत आहे. (हेही वाचा - Realme Days Sale: रियलमी च्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर 7 हजार रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या 'रियलमी डेज सेल'च्या खास ऑफर्स)
याशिवाय आपण हा स्मार्टफोन 6 महिन्यांच्या कोस्ट ईएमआय पर्यायावर खरेदी करू शकता. अॅमेझॉनकडून केलेल्या खरेदीवर 10% त्वरित सवलत उपलब्ध असेल. मात्र, केवळ एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणारे या सूटचा लाभ घेण्यास सक्षम असतील.
ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये डार्क मोडचा पर्याय देण्यात आला असून फोनची बॉडीची डिझाईन 3डी कर्व्ड आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स 2 मेगापिक्सलचा आणि तिसरा लेन्स 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2020 11:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

