OnePlus Nord Smartphone Launched In India: भारतामध्ये लॉन्च झाला 'वनप्लस नॉर्ड' स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत, खास वैशिष्ट्ये व Specifications
वनप्लसने (OnePlus) आपला बहुप्रतीक्षित सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) असे आहे. या वनप्लस स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 4 ऑगस्टपासून Amazon, OnePlus.in आणि वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
वनप्लसने (OnePlus) आपला बहुप्रतीक्षित सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) असे आहे. या वनप्लस स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 4 ऑगस्टपासून Amazon, OnePlus.in आणि वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन सुमारे 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजसह येतो. वनप्लसचा हा परवडणारा स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस 10.5 वर आधारित Android 10 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे. वनप्लस 8 सिरीजप्रमाणेच वनप्लस नॉर्ड स्मार्टफोनला 5 जी सपोर्ट आहे.
याव्यतिरिक्त, या चीनी स्मार्टफोन ब्रँडने 4,990 रुपये किंमतीसह वनप्लस बड्स देखील सादर केला. वनप्लस नॉर्ड हा फोन 6 जीबी + 64 जीबी, 8 जीबी + 128 जीबी आणि 12 जीबी + 256 जीबी अशा तीन प्रकारांमध्ये बाजारात आणला आहे. वनप्लस नॉर्ड स्मार्टफोनची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे- फ्लॅगशिप कॅमेरा, नाईटस्केप, ड्युअल सेल्फी कॅमेरा, ऑक्सीजनओएस (OxygenOS), 90Hz सह AMOLED डिस्प्ले स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 765G SoC, 5G रेडी, 765G SoC ही आहेत.
नव्याने लॉन्च केलेला वनप्लस नॉर्ड Onyx Grey आणि Marble Blue अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. (हेही वाचा: इनफिनिक्स कंपनीने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून, वनप्लस नॉर्ड हा फोन जियो ग्राहकांसाठी 6000 रुपयांपर्यंतची सवलत आणि अमेरिकन एक्स्प्रेस कार्डवर 2000 रुपयांची ऑफरसह उपलब्ध असेल. या फोनसाठी ग्राहक सर्व प्रमुख बँकांमध्ये 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील घेऊ शकतात.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 48 एमपी क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स, 5 एमपी डीपथ सेन्सर आणि 2 एमपी मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. फ्रंटमध्ये 32 एमपीचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे. अँड्रॉइड 10 वर आधारित हा फोन OxygenOS 10.5 मध्ये येतो. हे. फोनमध्ये 4115mAh बॅटरी व Warp Charge 30T चार्जर आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)