4000 रुपयांच्या इंस्टेट डिस्काउंटवर OnePlus 9RT खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफरबद्दल अधिक

OnePlus 9RT हा नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोन हा ग्राहकांना अॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. तर प्राइम मेंबर्सला म्हणजेच आजपासून 9 आरटी स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

OnePlus- प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits-Twitter)

OnePlus 9RT हा नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोन हा ग्राहकांना अॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. तर प्राइम मेंबर्सला म्हणजेच आजपासून 9 आरटी स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. फोन दोन रॅम ऑप्शनमध्ये येणार आहे. याच्या 8 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 12 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज वेरियंट 46,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.(Samsug Galaxy S22 स्मार्टफोन सीरिज 'या' दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक)

अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदी केल्यास 4 हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. तर फोनच्या खरेदीवर अधिकाधिक 14,999 रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जाणार आहे. फोन नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर ही खरेदी करता येणार आहे.

OnePlus 9RT स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. फोनचा मुख्य कॅमेरा 50MP चा असेल. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. फोनमध्ये अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus 9RT स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC चिपसेट सपोर्टसह येईल.

8GB रॅम आणि 128GB सह OnePlus 9RT च्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 3,299 (सुमारे 38,600 रुपये) आहे. तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,499 (सुमारे 40,900 रुपये) आहे. OnePlus 9RT स्मार्टफोनची किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 3,799 (सुमारे 44,400 रुपये) आहे. OnePlus 9RT स्मार्टफोनची विक्री 19 ऑक्टोबर रोजी आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत, फोनच्या खरेदीवर सुमारे 1,200 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

OnePlus 9RT स्मार्टफोन ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह येईल. OnePlus 9RT स्मार्टफोन Android 11 आधारित Oppo च्या ColorOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ डिस्प्ले पॅनल आहे. त्याचे रिझोल्यूशन (1,080x2,400 पिक्सेल) आहे. फोनमध्ये Samsung E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. OnePlus 9RT स्मार्टफोनची पीक ब्राइटनेस 1300 nits आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचा टच सॅम्पलिंग रेट 1300Hz आहे.

OnePlus 9RT स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सपोर्टसह येईल. हा फोन Android 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. OnePlus 9RT स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP असेल. OnePlus 9RT मध्ये 16MP चा दुय्यम कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन ड्युअल एलईडी फ्लॅश सपोर्टसह येईल. फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये 16MP Sony IMX471 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus 9RT वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्ट दिला गेला आहे.

पॉवर बॅकअपसाठी, OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ड्युअल सेल बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 65T वार्प चार्ज सपोर्टसह येईल. OnePlus 9RT स्मार्ट फोनचे डायमेंशन 162.2x74.6x8.29mm आहे. तर वजन 198.5 ग्रॅम आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now