आता Reels बनवल्यानंतर होणार पैशांचा पाऊस! महिन्याला मिळणार 3 लाख रुपये, Facebook ने केली मोठी घोषणा
फेसबुकच्या मालकीच्या कंपनी मेटाने घोषणा केली आहे की, फेसबुक रीलमध्ये मूळ सामग्री तयार करणाऱ्या निर्मात्यांना दरमहा 3.07 लाख रुपये दिले जातील.
तुम्हालाही रील (Reels) बनवण्याचा शौक असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही रिल्सच्या माध्यमातून फेसबुकवरूनही कमाई करू शकता. Reels च्या माध्यमातून तुम्ही दरमहा 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता. फेसबुकच्या मालकीच्या कंपनी मेटाने घोषणा केली आहे की, फेसबुक रीलमध्ये मूळ सामग्री तयार करणाऱ्या निर्मात्यांना दरमहा 3.07 लाख रुपये दिले जातील.
कॉन्टेंट क्रिएटर्संला हे पेमेंट डॉलरमध्ये दिले जाईल, जे रीलवरील व्यूजच्या संख्येवर अवलंबून असेल. Facebook Reels वर दरमहा 4,000 डॉलर्स पर्यंत कमावण्याची संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर आपण या डॉलरचे रुपांतर रुपयात केले तर ही रक्कम सुमारे 3.07 लाख रुपये आहे. (हेही वाचा - फेसबुक वापरकर्त्यांना मोठा झटका! 'हे' चार फीचर्स होणार 31 मे पासून बंद; पाहा यादी)
अशा प्रकारे तुम्ही Reels मधून कमाई करू शकला -
मेटाने एका निवेदनात म्हटलं आहे की, आम्ही Facebook वर "चॅलेंजेस" सादर करत आहोत, जे क्रिएटर्संना कॉन्टेंटद्वारे कमाई करण्यास मदत करते. याद्वारे, एका महिन्यात 4000 डॉलर्सपर्यंत कमाई करता येते. कंपनीने सांगितले की, या कार्यक्रमाअंतर्गत काही आव्हाने निश्चित करण्यात आली आहेत आणि प्रत्येक आव्हानावर निर्माते पैसे कमाऊ शकतात.
उदाहरणार्थ -
पहिल्या स्तरावर, जेव्हा क्रिएटर्संच्या 5 रील्सपैकी प्रत्येकाने 100 व्यूज ओलांडली, तर तुम्हाला $20 मिळतील. जेव्हा क्रिएटर्सने एखादे आव्हान पूर्ण केले, तेव्हा पुढील आव्हान अनलॉक केले जाते. 5 रील आव्हान पूर्ण केल्यानंतर, निर्मात्यांना $100 मिळवून 20 रीलवर 500 व्यूज पूर्ण करण्याचे आव्हान असेल. त्यानंतर महिना पूर्ण झाल्यावर तुम्हाला 0 पासून सुरू करावे लागेल.