Nokia घेऊन येणार स्वस्त Android Go स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होणार लॉन्च
नोकियाने (Nokia) गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.4 लॉन्च केला होता. त्यानंतर आता कंपनी लकरच आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्चिंग करण्याच्या तयारीत आहे.
नोकियाने (Nokia) गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.4 लॉन्च केला होता. त्यानंतर आता कंपनी लकरच आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्चिंग करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, कंपनी 15 डिसेंबरला त्यांचा नवा लो बजेट स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. जो अॅन्ड्रॉइड 10 गो अॅडिशनवर आधारित असणार आहे. कंपनी सध्या हा स्मार्टफोन चीन मध्ये उपलब्ध करुन देणारआहे.(Mi कंपनी घेऊन येणार मेड इन इंडिया QLED 4K स्मार्ट टिव्ही, जाणून घ्या किंमतीसह खासियत)
nokiamob रिपोर्टनुसार, नोकियाचा नवा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 गो अॅडिशनवर आधारित असणार आहे. तर हा लो बटेज रेंज अंतर्गत चीनमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ही माहिती चीनच्या मायक्रो ब्लॉगिंग साइट Weibo च्या माध्यमातून समोर आली आहे. अॅन्ड्रॉइड गो अॅडिशन असल्याने त्यामध्ये गुगल अॅप सारखे mail. maps, voice assistance सपोर्ट करणार आहे. मात्र चीनमध्ये गुगल अॅप काम करत नाही. अशातच कंपनीने चीन मध्ये अॅन्ड्रॉइड 10 अॅडिशन घेऊन येण्यासाठी काही वर्कअराउंड देऊ शकतात.
दरम्यान अद्याप कंपनीने अपकमिंग अॅन्ड्रॉइड 10 गो अॅडिशन वर आधारित स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती दिली नाही आहे. यामुळे युजर्सला थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. पण HMD Global पुढील वर्षाच्या सुरुवातीला Nokia 5.4 आणि Nokia 9.3 PureView उतरवणार आहे. जो गेल्या काही दिवसांपूर्वी TENAA वर आधारित लिस्ट करण्यात आला होता.(Trojan Horse Virus: चीनी कंपनी Gionee ने 2 कोटी मोबाईलमध्ये व्हायरस सोडून कमावले कोट्यावधी रुपये; कोर्टाने सुनावली शिक्षा)
गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात नोकिया कंपनीचा Nokia 2.4 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. ज्याची किंमत 10,399 रुपये ठेवली गेली आहे. स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. हा अॅन्ड्रॉइड 10 आणि अॅन्ड्रॉइड 11 Ready वर काम करणार आहे. तसेच MediaTek Helio P22 चिपसेट लेस असून यामध्ये युजर्सला मायक्रोएसडीच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. फोनचा प्रायमरी सेंसर 13MP असून 2MP डेप्थ सेंसर मिळणार आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी 4500MaH ची बॅटरी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)