नोकिया या स्मार्टफोन्सवर देत आहे जबरदस्त कॅशबॅक ; सॅमसंगने कमी केल्या किंमती

नोकीयाने प्रिमीयम स्मार्टफोन Nokia 8 Sirocco वर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केल्या आहेत. सॅमसंगने देखील काही निवडक स्मार्टफोन्सच्या किंमतीही कमी केल्या आहेत.

नोकिया स्मार्टफोन्स (Photo Credits: Nokia Official Website)

फेस्टिव सीजनमध्ये स्मार्टफोन कंपन्या युजर्सासाठी खास ऑफर्स सादर करत आहेत. नोकीयाने प्रिमीयम स्मार्टफोन Nokia 8 Sirocco वर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केल्या आहेत. सॅमसंगने देखील काही निवडक स्मार्टफोन्सच्या किंमतीही कमी केल्या आहेत. पाहुया काय आहे ऑफर....

Nokia 8 Sirocco

नोकीयाने भारतातील काही स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर सुरु केली आहे. त्यासाठी नोकीयाने HDFC बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. या कराराअंतर्गत Nokia 8 Sirocco या फोनवर 5,550 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. गेल्या आठवड्यात याच स्मार्टफोनच्या किंमतीत 13 हजार रुपयांची सूट जाहिर केली होती. Nokia 8 Sirocco ची किंमत 49,995 इतकी होती. त्यात 13 हजारांचे डिस्काऊंट आणि 5,550 रुपयांच्या कॅशबॅकनंतर हा फोन 31,449 रुपयांना मिळत आहे.

यावर मिळत आहे कॅशबॅक

nokia 1- ची किंमत 4999 रुपये असून त्यावर 500 रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला 4499 रुपयांना उपलब्ध होईल. त्याचबरोबर nokia 2 आणि nokia 2.1 या स्मार्टफोन्सची किंमत 6999 रुपये असून 700 रुपयांच्या कॅशबॅकमुळे हा फोन तुम्हाला 6299 उपलब्ध होईल. nokia 3 ची किंमत 8499 रुपये आहे. 850 रुपयांच्या कॅशबॅकमुळे हा फोन तुम्हाला 7649 रुपयांना मिळेल. तसंच 10,499 रुपयांचा nokia 3.1 या स्मार्टफोनवर 1050 रुपये कॅशबॅक मिळत असून 9449 रुपयांना तुम्ही हा फोन खरेदी करु शकता.

HDFC कार्डधारकांना मिळेल फायदा

या ऑफरचा लाभ केवळ एचडीएफसी बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांनाच मिळेल. 5,550 कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला HDFC च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन हा फोन खरेदी करावा लागेल. याशिवाय नोकीयाच्या काही निवडक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. ज्यात Nokia 8, Nokia 6.1, Nokia 5.1, Nokia 3 अनेक स्मार्टफोन्स सहभागी आहेत. ज्यावर HDFC च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास कॅशबॅक मिळत आहे.

सॅमसंगने देखील कमी केल्या किंमती

सॅमसंगने देखील ४ स्मार्टफोन्सच्या किंमतीत घट केली आहे. कंपनीने Galaxy J2 (2018), Galaxy J2 Core, Galaxy J4, आणि Galaxy J6 या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. ही ऑफर 15 नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिड आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया

Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये

Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अ‍ॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत

Advertisement

TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement