Nokia C30: नोकिया सी-सीरिजमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च; पहा काय आहे खासियत आणि किंमत
लोकप्रिय मोबाईल ब्रँड नोकियाची पॅरेन्ट कंपनी एचएमडी ग्लोबलने गुरुवारी आपल्या सी-सीरिज पोर्टफोलिओमध्ये नोकिया सी 30 ह्या नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.
लोकप्रिय मोबाईल ब्रँड नोकियाची (Nokia) पॅरेन्ट कंपनी एचएमडी ग्लोबलने (HMD Global) गुरुवारी आपल्या सी-सीरिज (C Series) पोर्टफोलिओमध्ये नोकिया सी 30 (Nokia C 30) हा नवीन स्मार्टफोन लान्च केला आहे. नोकिया सी 30 स्मार्टफोन 3GB+32GB आणि 4GB+64GB ह्या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये आणि 11,999 रुपये इतकी आहे. (Nokia Launch Purebook S14 Laptop: नोकियाचा दमदार प्योरबुक एस 14 लॅपटॉप लाँच, ही आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत)
हा स्मार्टफोन ग्रीन (Green) आणि व्हाईट (White) या दोन रंगात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Nokia.com, ई-कॉमर्स वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोअर्स मध्ये खरेदीसाठी मिळेल. (Nokia 110 4G आणि Nokia 105 4G लॉन्च, शानदार फिचर्ससह किंमती बद्दल जाणून घ्या अधिक)
पहा व्हिडिओ:
"नवीन नोकिया सी 30 ही आमच्या सी-सीरिज रेंजमध्ये सर्वात पॉवरफुल सिरीज आहे. कमीत कमी दरात उत्कृष्ट मोबाईल अनुभवाचे उत्तम उदाहरण म्हणजे हा नवीन स्मार्टफोन आहे," असे एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष सनमीत सिंग कोचर म्हणाले. कमी शुल्क, मोठी स्क्रीन, नोकियाची खास सुरक्षा आणि टिकाऊपणा हे नोकिया सी 30 आकर्षक फीचर्स असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच HD+ डिस्प्ले आणि 6,000mAh ची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जवर ही बॅटरी तीन दिवस टिकू शकते असा कंपनीचा दावा आहे. तसेच यामध्ये 13 MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. जिओ एक्सक्लुझिव्ह ऑफरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना खरेदी किंमतीवर 10 टक्के किंवा जास्तीत जास्त 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. ग्राहकांना 3GB आणि 4GB व्हेरिएन्टसाठी अनुक्रमे 9,999 आणि 10999 रुपये द्यावे लागतील.