Mumbai Metro: आता What's App वर मिळवू शकता अंधेरी-घाटकोपर मेट्रोचे ई-तिकीट; जाणून घ्या फायदे व प्रक्रिया
त्यानंतर वापरकर्त्याला तिकीट खरेदी करायचे असल्यास संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल
मुंबईतील मेट्रो वनची पहिली मेट्रो रेल्वे (Mumbai Metro) कागदी तिकीट म्हणून विकल्या जाणाऱ्या कागदावरील खर्च कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर कॉरिडॉरवर एक ई-तिकीटिंग (E-Ticketing) प्रणाली सुरू केली गेली, ज्यामध्ये प्रवासी कागदी तिकीट बाळगण्याऐवजी ई-तिकीटासाठी WhatsApp संदेशाचा वापर करू शकतील. या हरित उपक्रमामुळे दरवर्षी किमान 228 झाडे वाचविण्यात मदत होईल.
कागदी तिकिटांच्या छपाईचा खर्च दरवर्षी सुमारे 32.85 लाख रुपये येतो. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) च्या अधिकार्यांच्या मते, ते दररोज सरासरी 1.25 लाख तिकिटे विकतात ज्यापैकी 80 टक्के कागदी तिकिटे असतात. MMOPL अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी अजूनही कार्ड किंवा मोबाइल तिकिटांसारख्या इतर पर्यायांपेक्षा कागदी तिकिटांना प्राधान्य देत आहेत, यावर उपाय म्हणून ई-तिकिटे सादर केली गेली आहेत.
आर-इन्फ्रा (R-Infra) च्या MMOPL नुसार, WhatsApp वर ई-तिकीट ऑफर करणारी ही जगातील पहिली मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम असेल. अधिकाऱ्याने सांगितले की, हा सध्या तिकीट काउंटरवर उपलब्ध असलेल्या पेपर क्यूआर (QR) तिकिटाचा विस्तार आहे. पुढे जाऊन, प्रवाशांना विनंती करतो की, त्यांनी ई-तिकीट निवडावे जे WhatsApp वर वितरित केले जाईल. यामुळे कागदी तिकिटे काढून टाकण्यास आणि डिजिटल तिकिटांना प्रोत्साहन देण्यास मदत मिळेल.’ (हेही वाचा: लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार Mercedes-Benz, Scania आणि Volvo च्या लक्झरी बसेस; जाणून घ्या सुविधा व मार्ग)
हे ई-तिकीट कसे वापरावे-
- 9670008889 वर WhatsApp वरून ‘हाय’ असा मेसेज करा किंवा QR कोड स्कॅन करा.
- त्यानंतर हे सुरुवातीचे स्टेशन आणि गंतव्य स्थानकांचे पर्याय दिसून येतील, जे निवडणे आवश्यक आहे. हा प्रवास सिंगल आहे की रिटर्न आहे तेही नमूद करावे लागेल.
- त्यानंतर एक OTP येईल जो रोख रकमेसह तिकीट काउंटरवर शेअर करणे आवश्यक आहे.
- स्कॅन केल्यानंतर प्रवासासाठी ई-तिकीट वापरले जाऊ शकते.
- ई-तिकीटावर भाडे, तारीख आणि जारी करण्याची वेळ दर्शवली जाईल.
दरम्यान, हे ई-तिकीट एकदा विकत घेतल्यावर 20 मिनिटांसाठी लाइव्ह असेल आणि निर्गमन स्टेशनवर स्कॅन करणे आवश्यक आहे. त्यानंतर वापरकर्त्याला तिकीट खरेदी करायचे असल्यास संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. हे तिकीट प्रवास सुरू झाल्यानंतर, संपूर्ण प्रवासाच्या वेळेसाठी- 75 मिनिटे सक्रिय असेल. परतीचे तिकीट दिवसभर सक्रिय असेल. तिकीटाचा हा प्रकार सहज उपलब्ध असेल, ई-तिकीटांवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही, जसे की कागदी तिकिटे फाटली जातात किंवा त्याची शाई ओली झाल्यास ती पुसली जाते. अशी तिकिटे गमावण्याचीही भीती नसते.