Motorola One Fusion Plus उद्या Flipkart वर सेल , 6GB रॅम असलेल्या या स्मार्टफोनची काय आहेत खास वैशिष्ट्ये
या सेलमध्ये हा फोन 17,499 रुपयात उपलब्ध होईल. मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला EMI चा पर्यायही देण्यात आला आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला चा नवा स्मार्टफोन Motorola One Fusion Plus चा उद्या (17 ऑगस्ट) फ्लिपकार्टवर (Flipkart) ओपन सेल होणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता हा सेल सुरु होईल. या सेलमध्ये हा फोन 17,499 रुपयात उपलब्ध होईल. मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला EMI चा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना हा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांनी 1945 रुपये प्रति महिना EMI भरून खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन मूनलाइट वाइट आणि ट्विलाइट ब्लू या दोन रंगात उपलब्ध होईल. Axis Bank Credit Card वरून पेमेंट करणा-यांना 5% अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे.
या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले कर, यात 6.5 इंचाची फुल एचडी प्लस नॉच डिस्प्ले मिळते. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसह येतो. Motorola One Fusion Plus मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्य्याने 1TB पर्यंत वाढवू शकतो. Soundcore कंपनीने भारतात लाँच केले Life Dot 2 ईयरबड्स; 100 तासांच्या म्यूजिक प्ले बॅकसह 'ही' आहेत याची खास वैशिष्ट्ये
यात 16MP चा मोटराइज्ड पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा आहे. तसेच 8MP चा वाइड अँगल, 5MP चा मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर मिळतो. फ्रंट कॅमे-यासाठी कंपनीने यात 16MP चा कॅमेरा दिला आहे.
हा स्मार्टफोन रियर फिंगरप्रिंट सेंसरसह येतो. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.