Mobile Phone Theft: चोरीला गेलेल्या फोन रिकव्हरीमध्ये कर्नाटक व तेलंगणा अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

मोबाईल चोरी आणि बनावट मोबाईल उपकरणांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने हे पोर्टल विकसित केले आहे.

Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mobile Phone Theft: मोबाईल फोनची (Mobile Phone) चोरी ही नागरिक आणि प्रशासन अशा दोन्हींसाठी मोठी समस्या ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी, बस, ट्रेन, मेट्रोमध्ये सर्रास फोनची चोरी होती,  मात्र ते परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. अशात कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांनी चोरीचे फोन रिकव्हर करण्यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. दररोज सरासरी 76 चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल जप्त करण्यात येत असून, मोबाईल फोनच्या रिकव्हरीमध्ये तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

तेलंगणामध्ये 19 एप्रिल 2023 रोजी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CIER) पोर्टल सुरू झाल्यापासून राज्य पोलिसांनी 30,049 मोबाईल उपकरणे जप्त केली आहेत. मोबाईल चोरी आणि बनावट मोबाईल उपकरणांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने हे पोर्टल विकसित केले आहे.

हे पोर्टल 17 मे 2023 रोजी देशभरात अधिकृतपणे सुरू करण्यात आले होते, परंतु ते प्रायोगिक तत्त्वावर तेलंगणामध्ये 19 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले होते. हे पोर्टल राज्यातील सर्व 780 पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे. महेश भागवत, तत्कालीन एडीजी, सीआयडी हे पहिले राज्यस्तरीय नोडल अधिकारी होते ज्यांनी राज्यात आणि बाहेर मोबाईल रिकव्हरी सुव्यवस्थित केली. गेल्या नऊ दिवसांत 1,000 उपकरणे जप्त करण्यात आली आहेत आणि तक्रारकर्त्यांना देण्यात आली आहेत. (हेही वाचा: Cyber Crime: सरकारी अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक; अशी तोतयागिरी करणाऱ्यांबाबत सरकारचा सावधगिरीचा इशारा, 'या' ठिकाणी करू शकाल तक्रार)

हैद्राबाद आयुक्तालयाने 4,869 मोबाईल उपकरणांसह सर्वाधिक रिकव्हरी केली आहे, त्यानंतर सायबराबाद आयुक्तालयाने 3,078 आणि रचकोंडा आयुक्तालयाने 3042 मोबाईल उपकरणे मिळवली आहेत. वारंगल आयुक्तालयाने 1,919 उपकरणे जप्त केली, त्यानंतर निजामाबादने 1,556 उपकरणे जप्त केली. साधारण याच कालावधीमध्ये 35,945 मोबाईल फोन्सच्या रिकव्हरीसह कर्नाटक देशात प्रथम स्थानावर आहे. 15,426 उपकरणांच्या पुनर्प्राप्तीसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश 7,387 उपकरणांसह चौथ्या स्थानावर आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif