IPL Auction 2025 Live

Fraud WhatsApp Number Deactivation: व्हॉट्सअॅपद्वारे फसवणूक करण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक होणार रद्द- अश्विनी वैष्णव

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबत माहिती दिली आहे. वैष्णव यांनी म्हटले आहे की, मेटा (Meta) कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मोबाइल नंबरची नोंदणी रद्द करण्याचे मान्य केले आहे.

WhatsApp (PC- Pixabay)

एखाद्या फोन क्रमांकाचा वापर करुन व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून फसवणूक केल्याचे किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले तर संबंधीत मोबाईल क्रमांकाची नोंदणी रद्द केली जाणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबत माहिती दिली आहे. वैष्णव यांनी म्हटले आहे की, मेटा (Meta) कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मोबाइल नंबरची नोंदणी रद्द करण्याचे मान्य केले आहे. तसेच, ज्यांच्या मोबाइल अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या आहेत त्यांच्या सेवा आधीच त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डिस्कनेक्ट केल्या गेल्या आहेत, असेही दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले.

वैष्णव यांनी म्हटले आहे की, आम्ही व्हाट्सएपशी सक्रियपणे गुंतलो आहोत. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. फसवणूक करणारे वापरकर्ते म्हणून आढळलेल्या वापरकर्त्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी ते (टा (Meta) कंपनीची मालकी असलेले व्हॉट्सअॅपने ) पूर्णपणे तयार आहेत. ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने WhatsApp वर तथाकथित आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून कॉल करणाऱ्या स्कॅमरना थांबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलल्याेच वैष्णव यांनी सांगितले. (हेही वाचा, Whatsapp Chat Lock Feature: व्हॉट्सअॅपमध्ये जोडले गेले नवे 'चॅट लॉक' फिचर; आता युजर्सचे प्रायव्हेट संभाषण राहणार आणखी सुरक्षित)

वैष्णव यांनी म्हटले की, व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्मवरून वाईट प्रवृत्तीने तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तसेच, वापरकर्त्यांना सुरक्षीत सेवाेची अुनूभूती देण्यासाठी सरकार म्हणून आम्ही कटीबद्ध आहोत. वापरकर्त्याच्या सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सेवांमध्ये WhatsApp एक अग्रणी आहे. आम्ही नियमितपणे वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचे शिक्षण आणि जागरूकता चालविण्यासह, ब्लॉक आणि अहवाल, द्वि-चरण सत्यापन, यासारखी अनेक अंगभूत सुरक्षा साधने प्रदान करत आहोत, असेही त्यांनी सागितले.

अश्विनी वैष्णव या तीन-पक्षीय ग्राहक-मुखी क्षेत्रीय सुधारणांच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, लोकांचा फोन हरवल्यास किंवा तो चोरीला गेल्यास, ग्राहक दूरसंचार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संचार साथी नावाच्या वेब पोर्टलद्वारे तो ब्लॉक आणि ट्रॅक करू शकतात. सेवेला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) चे समर्थन आहे.

फसवणूक करणारे ग्राहक ओळखण्यासाठी, सरकारने टेलिकॉम सिम ग्राहक पडताळणीसाठी ASTR किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेशियल रेकग्निशन-संचालित उपाय देखील राबवले आहेत. मोबाईल फोन, एकदा चोरीला गेल्यावर, ओळख चोरी, बनावट माहिती (केवायसी) आणि बँकिंग फसवणूक यासारख्या विविध फसवणुकीसाठी त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी हे वेबपोर्टल (संचार साथी) विकसित करण्यात आले आहे, असे मंत्री म्हणाले.