नेटक-यांसाठी धक्कादायक बातमी! 1 डिसेंबर पासून महागणार मोबाईल इंटरनेट; भारतातील कोट्यवधी लोकांना बसणार या दरवाढीचा फटका

टेलिकॉम कंपन्यांना झालेल्या काही आर्थिक अडचणींमुळे एअरटेल, आयडिया-व्होडाफोन आणि बीएसएनएलने 1 डिसेंबरपासून आपले मोबाईल डाटाचे दर वाढविण्याची घोषणा केली आहे. मटा ने दिलेल्या बातमीनुसार, लवकरच मोबाईल इंटरनेट सेवा महागण्याची शक्यता आहे.

नेटक-यांसाठी धक्कादायक बातमी! 1 डिसेंबर पासून महागणार मोबाईल इंटरनेट; भारतातील कोट्यवधी लोकांना बसणार या दरवाढीचा फटका
Vodafone-Idea And Airtel | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

भारतात मोबाईलच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईल इंटरनेट चा वापरही तितक्याच प्रमाणा वाढला आहे. सध्या संपुर्ण भारत हा नेटमय झाले असून काही दिवसांनी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आता मोबाईल इंटरनेटवरही भारतीय चालतील असे म्हणायला हरकत नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेट सेवा ही खूप स्वस्त आहे. मात्र आता टेलिकॉम कंपन्यांना झालेल्या काही आर्थिक अडचणींमुळे एअरटेल (Airtel), आयडिया-व्होडाफोन (Idea-Vodafone) आणि बीएसएनएलने  (BSNL) 1 डिसेंबरपासून आपले मोबाईल डाटाचे दर वाढविण्याची घोषणा केली आहे. मटा ने दिलेल्या बातमीनुसार, लवकरच मोबाईल इंटरनेट सेवा महागण्याची शक्यता आहे.

ही सर्व मोबाईल इंटरनेट वापरण-यांसाठी धक्कादायक बातमी असून याचा फटका भारतात इंटरनेट वापरणा-या कोट्यवधी लोकांना बसणार आहे. ग्राहकांना मोठा धक्का; व्होडाफोन-आयडिया, एअरटेल कपंनीनंतर जिओने घेतला 'हा' मोठा निर्णय

भारतीय बाजारात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, टेलिकॉम कंपन्यांना 90 हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो आहे व्होडाफोन आयडिया 1 डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.

एअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2019 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).