Mivi Roam 2 ब्लूटूथ स्पिकर भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन

या शानदार स्पिकरचे डिझाइन अत्यंत आकर्षक आहे.

MiVI Roam 2 Speaker (Photo Credits-Twitter)

इलेक्ट्रॉनिक ब्रॅंन्ड MiVi ने त्यांचा आपला पहिला मेड इन इंडिया (Made In India) ब्लूटूथ स्पिकर ROAM 2 भाारतात लॉन्च केला आहे. या शानदार स्पिकरचे डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास ROAM 2 मध्ये 5 वॅटचा स्पिकर दिला आहे. या व्यतिरिक्त स्पिकरमध्ये दमदार बॅटरी मिळणार असून सिंगल चार्जमध्ये 24 तासांचा बॅकअप देणार आहे. तर जाणून घ्या ROAM 2 स्पिकरच्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती.(Soundcore ने भारतात लॉन्च केले गेमिंग हेडफोन्स, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Mivi Room 2 ब्लूटूथ स्पिकरची किंमत 1199 रुपये आहे. हा 4 Metallic कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हा स्पिकर कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart वरुन खरेदी करता येणार आहे. या स्पिकरमध्ये कंपनीने एचडी Stero साउंड आणि पॉवरफुल बास दिला आहे. तसेच स्पिकरमध्ये 2000mAh ची बॅटरी मिळणार आहे. ती सिंगल चार्जमध्ये 24 तासांचा बॅकअप देणार आहे. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास स्पीकरसाठी 5.0 ब्लूटूथ दिले आहे. ज्याची कनेक्टिव्हिटी रेंज 10m आहे. तर स्पिकरला IPX 67 ची रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच हा स्पिकर वॉटरप्रुफ आहे.(Instagram वरील 'या' दमदार फिचर्स बद्दल अधिक जाणून घ्या)

भारतीय बाजारात MiVi Room 2 ब्लूटूथ स्पिकरला Lumiford स्पिकरची टक्कर मिळणार आहे. Lumiford स्पिकर बद्दल बोलायचे झाल्यास हा ब्लुटूथ स्पिकर IPX7 सर्टिफाइड आहे. म्हणजेच हे डिवाइस ही वॉटरप्रुफ असून याचा वापर हलक्या पावसात ही केला जाऊ शकतो. त्यामुळे जर पावसात तुम्ही पार्टीचा प्लॅन करत असाल तर हा स्पिकर नक्कीच तुमच्या कामी येईल. या स्पिकरची साइज अत्यंत कॉम्पॅक्ट असल्याने तो कुठेही अत्यंत सहजपणे घेऊन जाता येणार आहे.