Microsoft Layoffs: मायक्रोसॉफ्टने 1,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले; जुलै 2022 पासून 1% लोकांना कमी केले

असे मानले जाते की कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. दरम्यान, युरोप आणि अमेरिकेत मंदी येण्याच्या शक्यतेमुळे जगभरातील अनेक लोक चिंतेत आहेत.

मायक्रोस्पॉट (Photo Credits: Pixabay)

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या दिग्गज आयटी कंपनीने 1,000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. जुलैनंतर कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून काढून टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. अमेरिकेच्या न्यूज वेबसाईटवरून ही बातमी समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे एकूण 1.80 लाख कर्मचारी आहेत आणि जुलैपासून कंपनीने त्यातील 1 टक्के लोकांना कामावरून काढले आहे. मायक्रोसॉफ्टच्या मते ते व्यवसायाच्या प्राधान्यक्रमांचे नियमितपणे मूल्यांकन करतात आणि त्याच्या आधारे निर्णय घेतले जातात.

जुलैमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर कंपनीने ग्राहक-केंद्रित संशोधन आणि विकास प्रकल्पांपैकी 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. अलीकडच्या काळात जागतिक आर्थिक संकट आणि मंदीच्या भीतीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यामुळे येणारे दिवस अधिक कठीण असू शकतात, असे मानले जात आहे. कंपनीने विविध स्तर आणि संघातील लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

कामावरून काढण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मात्र, नक्की किती जणांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, हे कंपनीने सांगितले नाही. Crunchbase ने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांनी 32,000 लोकांना नोकरीवरून काढले आहे. या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्टसह मेटा देखील समाविष्ट आहे. राइड-शेअरिंग प्लॅटफॉर्म उबेर आणि नेटफ्लिक्ससह अनेक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आणि कर्ज देण्याच्या प्लॅटफॉर्मने देखील लोकांना काढून टाकले आहे. (हेही वाचा: फ्रेशर्सना दिलेले ऑफर लेटर Wipro, Infosys आणि Tech Mahindra कडून रद्द; मुलाखती घेऊन नोकरभरती थांबवली)

अलीकडेच बातमी आली की, इंटेल कॉर्प मोठ्या प्रमाणावर लोकांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. असे मानले जाते की कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. दरम्यान, युरोप आणि अमेरिकेत मंदी येण्याच्या शक्यतेमुळे जगभरातील अनेक लोक चिंतेत आहेत. या समस्येमुळे लोकांच्या नोकऱ्या आणि रोजगारावर परिणाम होऊ लागला आहे.