TikTok App यापुढे भारतात डाऊनलोड करता येणार, मद्रास हायकोर्टाने अॅपवरील बंदी हटवली
गेल्या काही काळापासून चीनी अॅप TikTok वर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. तसेच या अॅपवरील बंदी कायम राहणार की नाही याबद्दल आज मद्रास हायकोर्टाने निर्णय घेतला आहे.
TikTok App Ban Lifted in India: गेल्या काही काळापासून चीनी अॅप TikTok वर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. तसेच या अॅपवरील बंदी कायम राहणार की नाही याबद्दल आज मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) निर्णय घेतला आहे. या आदेशावर सुनावणी करत न्यायाधीश एन. किरुबारकरन (N Kirubakaran) आणि एसएस. सुंदर (SS Sundar) यांच्या खंडपीठाने बंदी उठवण्यात आली असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता भारतीय टिकटॉक युजर्स हे अॅप डाऊनलोड करता येणार असल्याने आनंदीत होणार आहेत.
टिकटॉक अॅपमुळे लहानपासून ते जेष्ठ नागरिकांमध्ये याची क्रेझ फार वाढली होती. त्यामुळे टिकटॉकवर बंदी घालण्यात यावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच रंजन गोगई यांच्या खंडपीठाने मद्रास न्यायालयाने या संबंधित निर्णय घेतला नाही तर टिकटॉक अॅपवरील बंदी उठवण्यात येईल असे म्हटले होते. त्यानंतर गुगल प्ले स्टोर आणि आयओएसवरुन हे अॅप हटवण्यात आले होते. मात्र आज मद्रास न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णय घेतला असून आता पुन्हा भारतीय टिकटॉक युजर्सना हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे.
(भारतात TikTok बंद होण्याची शक्यात, मद्रास उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश)
TikTok App बीजिंग येथील एका कंपनीने बनवले आहे. या App च्या माध्यमातून युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवतात आणि ते शेअरही करु शकतात. भारताही TikTok APP प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून बॉलिवुडच्या संवांदांपासून ते विनोद आणि डान्सचे अनेक व्हिडिओ सहजपणे बनवता येतात. इतकेच नव्हे तर लिप सिंक माध्यमातून लोकप्रिय गाणी स्वत: गायली आहेत असेही भासवता येते
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2019 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

