Paytm च्या माध्यमातून LPG Cylinder बुकिंगवर मिळणार 500 रुपयांचा कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या

जर तुम्ही पेटीएमच्या (Paytm) माध्यमातून आपला एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) बुक करायचा विचार करत असल्यास तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Gas Cylinder Booking Paytm Offer | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जर तुम्ही पेटीएमच्या (Paytm) माध्यमातून आपला एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) बुक करायचा विचार करत असल्यास तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पेटीएमवरुन जर तुमचा एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तुम्हाला 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. पेटीएमने आपल्या अॅपवर एलपीजी सिलेंडर बुकिंग केल्यास 500 रुपयांचा कॅशबॅक देणार असल्याचे जाहीर केला आहे. तर पाचशे रुपयांचा हा कॅशबॅकचा लाभ अशा ग्राहकांना मिळणार आहे जे प्रथमच पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुकिंग करत आहेत. यासाठी ग्राहकांना एक कोड द्यावा लागणार आहे. तर जाणून घ्या ऑफर्सबद्दल अधिक.(Amazon Fab Phones Fest Sale 2020 सेलला 22 डिसेंबर पासून सुरुवात; Smartphones आणि Accessories वर 40% सूट)

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना Promo Section मध्ये जाऊन FIRSTLPG हा कोड द्यावा लागणार आहे. ग्राहकांनी पेटीएमच्या ऑफरचा फायदा फक्त एकदाच घेऊ शकतात. ही ऑफर येत्या 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरु असणार आहे.(भारतातील 'या' 4 मोठ्या बँकांसोबत WhatsApp Pay ची पार्टनरशीप; तब्बल 20 लाख युजर्संना घेता येईल डिजिटल पेमेंटचा लाभ)

>>'या' पद्धतीने Paytm च्या माध्यमातून सिलेंडर बुकिंगवर मिळवा कॅशबॅक

-सर्वात प्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये Paytm अॅप सुरु करा.

-आता Show More वर क्लिक करा.

- तेथे गेल्यावर डाव्या बाजूला एक कॉलम दिसल्यास Recharge and Pay Bills वर क्लिक करा.

-आता Book Cylinder या Icon वर क्लिक करा.

-येथे तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडरच्या प्रोव्हायडरची माहिती द्यावी लागणार आहे. तुम्हाला तीन ऑप्शन म्हणजेच Bharat Gas, Indane Gas आणि HP Gas असे दिसेल.

-आता तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा एलपीजी आयडी अथवा ग्राहक संख्या द्यावी लागणार आहे.

-असे केल्यानंतर Proceed वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आता गॅल सिलेंडरसाठी किती पैसे भरावे लागतील हे दाखवले जाईल.

-Paytm गॅस बुकिंग पूर्वी FIRSTLPG प्रोमोकोड अप्लाय करुन या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास किंवा मासिक वॉलेट सीमा पार केल्यास तुम्हाला गिफ्ट वाउचरमध्ये कॅशबॅक मिळणार आहे. लक्षात असू द्या की पेटीएमच्या या ऑफवर कोणीही निर्णय घेऊ शकतो.