LinkdIn वरील 500 मिलियन युजर्सचा फोन नंबर, ईमेल आयडी लीक
फेसबुक (Facebook) युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या प्रकरणाला एक आठवडा पण पूर्ण होत नाही अशातच आता मायक्रोसॉफ्ट अधिकृत प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंकडिन (LinkdIn) चा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबुक (Facebook) युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या प्रकरणाला एक आठवडा पण पूर्ण होत नाही अशातच आता मायक्रोसॉफ्ट अधिकृत प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंकडिन (LinkdIn) चा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 500 मिलियन युजर्चा डेटा लीक झाला असून त्यामध्ये त्यांचे फोन क्रमांक, ईमेल आयडी आणि कामाच्या ठिकाणाच्या माहितीसह अन्य काही गोष्टींचा समावेश आहे. या घटनेचा खुलासा सायबर न्यूज यांनी केला आहे. रिपोर्टमध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, युजर्सचा डेटा डार्क बेव (Dark Web) वर उपलब्ध आहे आणि हॅकर्सच्या ग्रुपकडून तो अत्यंत मोठ्या किंमतीत विक्री केला जात आहे.(WhatsApp, Facebook and Instagram Down: व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन; कंपनी सांगितलं 'हे' कारण)
डेटा लीक झाल्यानंतर कंपनीने स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, याचा तपास केला असता असे समोर आले आहे ज्यांचा डेटा लीक झाला आहे तो एखाद्या वेबसाइट्स किंवा कंपनीकडून घेण्यात आला आहे जो त्यांच्या प्लॅटफॉर्मचा याच्याशी कोणताही संबंध नाही आहे. पुढे त्यांनी असे म्हटले की, आम्ही जो एकूण रिव्हू केला त्यामध्ये असे ही कळले यामध्ये पब्लिकली व्यॅल्युएबल मेंबरचा प्रोफाइल डेटा जरुर आहे. जो लिंकडिन येथून घेण्यात आला आहे. मात्र हा एक ब्रीच नाही आहे. परंतु प्रायव्हेट मेंबरच्या अकाउंटचा डेटा आमच्या प्लॅटफॉर्मवरुन घेण्यात आलेला नाही. मात्र जेव्हा एखाद्याकडून डेटा लीक करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी आम्ही त्यांना त्यासाठी परवानगी देत नाही आणि तातडीने त्यावर बंदी घालतो. तर सध्या डेटा लीक झाल्याने कंपनीने युजर्सला पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे.(Google कडून मोठ्या बदलावांची घोषणा, फोनमध्ये असलेले 'हे' App होणार ब्लॉक)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 53.3 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाला होता. ज्यामध्ये 61 लाख डेटा भारतीय युजर्सचा होता. या लीक डेटामध्ये युजर्सची प्रत्येक माहितीचा समावेश होता. याप्रकरणी फेसबुकने स्पष्टीकरण देत असे म्हटले होते की, असे 2019 मध्ये सुद्धा झाले होते. मात्र त्यावेळी ती समस्या कंपनीने तेव्हाच सोडवली होती.