LG 'Wing' Smartphone: प्रसिद्ध एलजी कंपनी मंगळवारी लाँच करणार रोटेटिंग स्क्रीन स्मार्टफोन 'विंग'; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
साथीच्या काळात कंपनीने आपल्या हँडसेटची विक्री वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून स्थानिक बाजारात हा स्मार्टफोन लाँच करण्यात येईल. ज्याची किंमत 940 म्हणजेच 68,923.24 रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन 15 ऑक्टोबरला अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.
LG 'Wing' Smartphone: प्रसिद्ध एलजी इलेक्ट्रॉनिक्सने रविवारी सांगितले की, कंपनीचा नवीन ड्युअल स्क्रीन स्मार्टफोन, 'विंग' या आठवड्यात दक्षिण कोरियन बाजारात विक्रीसाठी आणला जाणार आहे. साथीच्या काळात कंपनीने आपल्या हँडसेटची विक्री वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून स्थानिक बाजारात हा स्मार्टफोन लाँच करण्यात येईल. ज्याची किंमत 940 म्हणजेच 68,923.24 रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन 15 ऑक्टोबरला अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.
योनहाप या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलजीने आधीचं स्पष्ट केलं आहे की, विंगसाठी कोणतीही प्री-ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. 14 सप्टेंबर रोजी लाँच झालेल्या या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील दोन भिन्न डिस्प्ले. यातील मुख्य स्क्रीन 90 अंशांवर पूर्णपणे फिरवणं शक्य होणार आहे. यात, पहिल्या स्क्रीनच्या तळापासून दुसरा स्क्रीन येईल आणि हा स्मार्टफोन टी आकारात एकत्र दिसेल. (हेही वाचा - Infinix Hot 10 स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार 5200mAh च्या बॅटरीसह 5 कॅमेरे, किंमत 10 हजारांपेक्षा कमी)
हा स्मार्टफोन जिंबल मोशन कॅमेरा तंत्रज्ञानासह सहा मोशन सेन्सर्ससह सुसज्ज आहे. ज्याच्या मदतीने, व्हिडिओ शूटिंग करताना स्थिरता मिळणं शक्य होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाची मुख्य स्क्रीन असून आस्पेक्ट रेशियो 20.5:9 असा असणार आहे. याशिवाय दुसरी स्क्रीन 3.9 इंचाची असून आस्पेक्ट रेशियो 1.15:1 इतका असणार आहे. (वाचा - भारतात येत्या 6 ऑक्टोबरला लाँच होणार Poco C3 स्मार्टफोन, कंपनीने ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती)
विंग क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी चिपसेटद्वारे चालविला जाणार आहे. जो ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटच्या सामान्य स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसरपेक्षा 10 टक्के वेगवान आहे. स्मार्टफोन विंगमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. जो मायक्रो एसडी कार्डसह 2 टीबी पर्यंत वाढविला जाऊ शकतो. या मोबाईची बॅटरी 4,000 एमएएच आहे.