CES 2019 : LG कंपनी लवकरच लाँन्च करणार फोल्डेबल टीव्ही
दक्षिण कोरियाची कंपनी LG लवरच ग्राहकांसाठी जगातील पहिला फोल्डेबल टीव्ही लाँन्च करणार आहे.
CES 2019 : दक्षिण कोरियाची कंपनी LG लवरच ग्राहकांसाठी जगातील पहिला फोल्डेबल टीव्ही लाँन्च करणार आहे. एलजी कंपनीचा हा टीव्ही OLED टेक्नॉलॉजी पेक्षा थोडा कमी असणार आहे. या टीव्हीच्या सीरिजला एलजी कंपनीने OLED TV R असे नाव दिले आहे. गेल्या वर्षात आयोजित केलेल्या CES मध्ये या टीव्हीची प्रतिकृती दाखवण्यात आलेली होती. त्यानंतर एक वर्षाच्या संशोधन आणि अभ्यासानंतर त्याला अजून योग्य रितीने बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
4K OLED सोबत या फोल्डेबल टीव्हीला एलजी कंपनीने 65 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच ग्राहक त्यांच्या नुसार ही टीव्ही हवा त्या आकारात फोल्ड करु शकतात. फक्त एक बटण दाबल्यावर 10 सेकंदाच्या आतमध्ये हा टीव्ही फोल्ड होऊन Sound Bar सारखा होणार असून दुसऱ्यांदा बटण दाबल्यावर पुन्हा टीव्हीचा आकार प्राप्त होणार आहे. या टीव्हीमध्ये एक Line Mode देण्यात आलेले आहे. त्यामुळे टीव्हीचा फक्त एक चतुर्थ भाग बॉक्सच्या बाहेर आलेला दिसणार आहे. या मोडचा उपयोग गाणी ऐकणे, वॉईस असिस्टंट आणि स्मार्टहोमच्या अन्य डिवाईसला ही कंट्रोल करु शकणार आहे. (हेही वाचा- Xiaomi कंपनी बनवणार फोल्डेबल स्मार्टफोन? पाहा व्हिडिओ)
लवकरच एलजीच्य या नव्या मॉडेलसाठी Amazon Alexa ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचसोबत रिमोटच्या सहाय्याने प्राईम व्हिडिओ बटणाद्वारे युजर्स एलेक्साशी बातचीत करण्यात येणार आहे.