लीप डे 2020: गुगल डुडल च्या मार्फत Google ने साजरं केलं Leap Year! या दिवसाविषयी न ऐकलेली माहिती जाणून घ्या
हे तर झालं सेलिब्रेशनचं पण लीप डे (Leap Day) किंवा लीप इयर असं का म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?
यंदाचे वर्ष म्हणजेच 2020 हे लीप वर्ष (Leap Year) आहे, दर चार वर्षांनी भौगोलिक स्थितीमुळे जुळून येणारा हा योग पृथ्वीवासीयांसाठी एक एक्सट्रा दिवस घेऊन येत असतो, त्यामुळे साधारण वारशात असणाऱ्या 365 दिवसांच्या ऐवजी या लीप वर्षात पूर्ण 366 दिवस असतात. आता हा अख्खा एक्सट्रा खास दिवस म्हंटला तर मग त्याचं सेलिब्रेशन करायला हवंच हो ना? तुमच्या आमच्या प्रमाणेच चक्क गुगलने आपल्या हटके शैलीत आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे. यंदाच्या लीप इयर मधील लीप डे म्हणजेच 29 फेब्रुवारी साठी गुगलतर्फे एक खास डुडल (Google Doodle) साकारण्यात आले आहे. हे तर झालं सेलिब्रेशनचं पण लीप डे (Leap Day) किंवा लीप इयर असं का म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?माहित नसेल तर काळजी करू नका.. यंदाच्या या खास दिवशी या दिवसाविषयी कधी न ऐकलेल्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत, चला तर मग.. Leap Year 2020 Funny Memes: लीप इयरच्या निमित्ताने सोशल मीडियावर मिम्स चा पाऊस; तुम्ही पाहिलेत का?
1) 29 फेब्रुवारीला दर चार वर्षांनी लीप डे हा दिवस ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण करण्यासाठी ज्या वर्षी 6 तास अधिक लागतात ते वर्ष लीप इयर म्ह्णून ओळखले जाते. ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हणतात. 2020 या आकड्यातील 20 ला 4 ने भाग जातो. म्ह्णून यंदाचे वर्ष हे लीप इयर आहे.
2) हिब्रू, चिनी आणि बौद्ध कॅलेंडर्ससह बरेच कॅलेंडर्स हे लुनिसोलार आहे आहेत, म्हणजेच यामध्ये पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेसोबतच चंद्राची स्थिती तसेच आणि पृथ्वीचे स्थान देखील लक्षात घेतले जाते. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना साधारणपणे 11 दिवसांचे नैसर्गिक अंतर असल्यामुळे अशा कॅलेंडर्समध्ये अधूनमधून अतिरिक्त महिने जोडले जातातमी म्हणजेच या कॅलेंडर मध्ये चक्क लीप महिने असतात.
3) नेहमीपेक्षा काहीतरे हटके करण्याचा हा दिवस आहे, याची कथा अशी की, परंपरेनुसार, 5 व्या शतकात आयर्लंडमध्ये महिलांना पुरुषांशी लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याची परवानगी नव्हती. पौराणिक कथांनुसार सेंट पॅट्रिक यांनी ही प्रथा बदलण्यासाठी दररोज न येणारा एकमेव दिवस, 29 फेब्रुवारी हा सूट दिवस म्हणून जाहीर केला. ज्यानुसार या दिवशी स्त्रियांना पुरुषांना प्रस्ताव देण्याची परवानगी देण्यात आली. काही ठिकाणी, लीप डे अशा प्रकारे बॅचलर डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
4) संपूर्ण जगात फक्त 5 मिलियन लोक आहेत ज्यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला होता, या दिवशी जन्मलेल्यांना लेपलिंग्ज या खास नावाने ओळखले जाते, ही मंडळी दर चार वर्षांनी एकदाच त्यांचा वाढदिवस साजरा करतात, परंतु ते एका एलिट गटाचा भाग बनतात. Leap Year Birthdays: मोरारजी देसाई ते रुक्मिणी देवी यांच्यासह पहा 29 फेब्रुवारी दिवस कोणासाठी आहे खास?
5) लीप वर्ष हे चांगले मानावे की वाईट हा वाद अनेक वर्षांपासून सुरु आहे, वास्तविकी हे अगदीच व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजेच एकाद्या तुरुंगातील किंवा नोकरदार मंडळींना पगारासाठी एक दिवस आणखी वाट पाहावी लागते म्हणून हा दिवस बॅड लक म्ह्णून ओळखला जाऊ शकतो. तर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि नवं करायचं असेल त्या हटके दिवसापेक्षा चांगली सुरुवात काय असेल हो ना?
चार वर्षांनी जुळून येणाऱ्या या लीप इयरच्या दिवशी तुम्ही आजवर न अनुभवलेल्या काही भन्नाट गोष्टी नक्कीच ट्राय करता येतील कारण हा दिवस आता थेट 2024मध्ये येणार आहे. आणि हो काय प्लॅन करताय हे आम्हाला कळवायला विसरू नका.