ग्राहकांना Jio ची भेट! आता विमानामध्ये घेऊ शकणार Calling, Internet चा आनंद; जाणून घ्या काय आहेत जिओचे आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्स
यामुळे जास्त कालावधीच्या प्रवासात तर प्रवाशांना जीव मेटाकुटीला यायचा. मात्र आता रिलायन्स जिओने (Reliance Jio) याच बाबत आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत आपल्याला विमानामध्ये (Flight) फोन कॉलिंगची (Calling) किंवा इन्टरनेट (Internet) वापरण्याची सुविधा नव्हती. यामुळे जास्त कालावधीच्या प्रवासात तर प्रवाशांना जीव मेटाकुटीला यायचा. मात्र आता रिलायन्स जिओने (Reliance Jio) याच बाबत आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने विमान प्रवासात कॉल करण्याची सोय जाहीर केली आहे. जिओने यासाठी एरोमोबाईलबरोबर भागीदारी केली आहे. एरोमोबाईल पॅनासॉनिक एव्हिओनिक्स कॉर्पोरेशनची सहाय्यक कंपनी आहे. या भागीदारी अंतर्गत जिओचे ग्राहक हवाई प्रवासात जिओच्या सर्व सेवांचा आनंद घेण्यास सक्षम असतील.
या कराराअंतर्गत ही सुविधा 22 विमानांमध्ये उपलब्ध होणार आहे. या सेवेद्वारे, JioPostpaid वापरकर्ते फ्लाइट दरम्यान त्यांचे मित्र आणि कुटूंबाशी बोलू शकतात. भारतीय विमानात ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्व जिओ ग्राहक त्याचा लाभ घेऊ शकतील. रिलायन्स जिओची ही सेवा स्विस इंटरनेशनल एअरलाइन्स, एअर सर्बिया, एलिटालिया, एशियन एअरलाईन्स, बिमान बांग्लादेश एअरलाईन्स, एमिरेट्स, एतिहाद एअरवेज, युरो विंग्स, कुवैत एअरवेज, मलेशिया एअरलाइन्स, मालिंदो एयर, SAS स्कॅन्डिनेव्हियन एअरलाईन, उझबेकिस्तान एअरवेज, व्हर्जिन अटलांटिक, अशा 22 आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर उपलब्ध असेल.
मात्र एयर लिंगस, कॅथी पॅसिफिक, इजिप्त एअर, ईव्हीए एअर, लुफ्थांसा, सिंगापूर एअरलाइन्स, टॅप एअर पोर्तुगाल आणि तुर्की एअरलाइन्समध्ये केवळ एसएमएसची सुविधा असेल.
असा करा पॅक अॅक्टिव्हेट -
>> सर्वप्रथम आपला स्मार्टफोन चालू करा आणि फ्लाइट मोड बंद करा, जो तुम्ही टेक ऑफ दरम्यान चालू केलेला असेल.
>> त्यानंतर आपला स्मार्टफोन एरोमोबाईल नेटवर्कशी कनेक्ट होईल. नेटवर्कचे नाव काय असेल हे आपल्या हँडसेटवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या हँडसेटमध्ये त्याचे नाव वेगवेगळे असू शकते.
>> जर तुमचा स्मार्टफोन एरोमोबाईल नेटवर्कशी आपोआप कनेक्ट झाला नसेल, तर तुमच्या फोन सेटिंग्जमध्ये दिलेल्या कॅरियरच्या पर्यायावर जा आणि तिथे एरोमोबाईल मॅन्युअली सिलेक्ट करा.
>> यानंतर आपला डेटा रोमिंग चालू असल्याचे सुनिश्चित करा. स्मार्टफोन एरोमोबाईल नेटवर्कशी कनेक्ट होताच आपल्याला एक संदेश आणि इतर माहिती मिळेल.
>> यानंतर आपण फ्लाइटमध्ये आपल्या स्मार्टफोनवरून कॉल, संदेश, ईमेल आणि इंटरनेट चालविण्यास सक्षम असाल. (हेही वाचा: विमानात मिळणार इंटरनेटची सुविधा; विस्तारा एअरलाईन्स उपलब्ध करून देणार वाय-फाय)
या सेवेच्या घोषणेसह जिओने तीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनची किंमत 499, 699 आणि 999 अशी आहे. या तीन प्लॅनची वैधता फक्त एक दिवस आहे. या तीन प्लॅनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला 100 मिनिटे कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. तर डेटाबद्दल बोलायचे झाले तर, 499 रुपयांच्या पॅकमध्ये 250 एमबी, 699 रुपयांच्या पॅकमध्ये 500 एमबी आणि 999 च्या पॅकमध्ये 1 जीबी डेटा मिळेल. या तीन प्लॅनमध्ये इनकमिंगची सुविधा मिळणार नाही.