JioPages Browser: जिओने लॉन्च केले स्वदेशी मोबाईल वेब ब्राउझर; जाणून घ्या याची खासियत आणि वैशिष्ठ्ये

याआंधी जिओचे Jio Browser होते, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता जिओ ब्राउझरच्या ठिकाणी अनेक नवीन बदल करून JioPages सादर केले आहे.

Reliance Jio (Photo Credits: Twitter)

भारतामधील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने Jio Pages नावाचे एक वेब ब्राउझर (Web Browser) लॉन्च केले आहे. याआंधी जिओचे Jio Browser होते, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता जिओ ब्राउझरच्या ठिकाणी अनेक नवीन बदल करून JioPages सादर केले आहे. चीनी लोकप्रिय वेब ब्राउझर यूसी (UC) वर बंदी घालण्यात आली असल्याने, आता जिओची आपल्या स्वदेशी वेब ब्राउझरवर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा आहे. याद्वारे वापरकर्त्यांना आपल्याकडे वळवण्याची त्यांची योजना आहे.

कंपनीचा असा दावा आहे की हा वेब ब्राउझर फास्ट असल्यासोबतच JioPages पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजेच, या वेब ब्राउझरवरील वापरकर्त्यांचा डेटा पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित असेल. JioPages सध्या केवळ Android वर उपलब्ध आहेत. हे Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. जिओ पेजेस सध्या 8 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. Jio Pages प्रत्यक्षात क्रोमियम ब्लिंग इंजिनवर विकसित केले गेले आहे. कंपनीने म्हटले आहे की हे फास्ट पेज लोड करते, मीडिया स्ट्रीमिंग एफिशियंट आहे आणि वापरकर्त्यांना एनक्रिप्टेड कनेक्शन मिळते. (हेही वाचा: नेटफ्लिक्सने केली 'फ्री सबस्क्रिप्शन' ऑफरची घोषणा; दोन दिवसांसाठी विनामूल्य पाहू शकाल सिरीज व चित्रपट, 4 डिसेंबरपासून सुरुवात)

JioPages वेब ब्राउझरवर, वापरकर्ते Google, बिंग, MSN आणि डक-डक गो सर्च इंजिन वापरू शकतात. वापरकर्त्यांना येथे कोणत्याही वेबसाइटच्या लिंक सेव्ह करण्याची सुविधा मिळेल. वेबसाइट लिंक सेव्ह केल्यामुळे, वापरकर्ते त्वरित त्यांच्या डिव्हाइसवर वेबसाइट सहजपणे उघडू शकतात. या भारतीय ब्राउझरसह, आपण आपल्या होम स्क्रीनवर कस्टमाइज आणि प्रायव्हेट मोड मध्ये बुकमार्क करू शकता. जिओ पेजेसवर बर्‍याच रंगीबेरंगी थीम आहेत, जे युजर्स त्यांच्या आवडीनुसार वापरू शकतात. वेब ब्राउझरमध्ये डार्क मोड देखील प्रदान केला आहे. यामध्ये हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांचा सपोर्ट आहे.