Jio कडून ग्राहकांना मिळणार प्रीपेड प्लॅनवर Cashback Offer सह अन्य धमाकेदार बेनिफिट्स

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवेनवे प्लॅन आणि ऑफर्स घेऊन येतात. मात्र यावेळी आणखी एका नवा प्लॅन आणला असून ग्राहकांना प्रीपेड रिचार्जवर 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.

Reliance Jio (Photo Credit: Facebook)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवेनवे प्लॅन आणि ऑफर्स घेऊन येतात. मात्र यावेळी आणखी एका नवा प्लॅन आणला असून ग्राहकांना प्रीपेड रिचार्जवर 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. या कॅशबॅकचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना जिओच्या अॅप किंवा वेबसाइटवरुन खरेदी करता येणार आहे. कॅशबॅक 249,555 आणि 599 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी लागू केला आहे.(VI ने भारतात लॉन्च केले जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिडेट कॉलिंगसह Disney Plus-Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन)

जिओचे असे म्हणणे आहे की, कॅशबॅक युजरच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाणार आहे. याचा वापर भविष्यातील रिचार्जसाठी करता येऊ शकतो. ही ऑफर फेस्टिव्हल सीजनपूर्वी येते. तीन प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. जिओने आपल्या प्रीपेड रिचार्ज मायक्रोसाइटसाठी एक नवे 20 टक्के कॅशबॅक सेक्शनमध्ये दाखवण्यासाठी आपल्या वेबसाइटवर अपडेट केले आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2021 ला 4 ऑक्टोबर पासून सुरुवात; 'या' ब्रँडच्या प्रॉडक्ट्सवर मिळणार भरगोस सूट)

-कंपनीचा 249 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह 2GB प्रति दिन डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल आणि प्रति दिन 100 SMS सह येणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर JIO स्पीड ही 64kbps पर्यंत होणार आहे.

-तर 555 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज 84 दिवसांचा असून प्रतिदिन 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS पाठवता येणार आहे.

-599 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. मात्र डेटा 2GB मिळणार आहे.

-तिन्ही प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सब्सक्रिप्शन सारखे अॅडिशनल बेनिफिट्सह येणार आहे.

या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी Jio ग्राहकांना MyJio App आणि Jio.com येथे भेट द्यावी लागणार आहे. टेल्कोने नुकत्याच एका वर्षभरासाठी Disney+Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शनसह नवे प्रीपेड प्लॅन सुद्धा उतरवले आहेत. हे रिचार्ज 499 रुपयांपासून सुरु होणार आहेत. जे 28 दिवसांच्या अनलिमिडेट कॉलिंग आणि SMS सह येणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now