Jio PostPaid Plus: 'जिओ'ने सादर केला पोस्टपेड प्लॅन; Netflix, Amazon Prime, Disney Plus Hotstar मिळणार मोफत, जाणून घ्या सविस्तर

आता वापरकर्त्यांचा अनुभव अजून सुधारण्यासाठी जियोने पोस्टपेड प्लस (Jio PostPaid Plus) ही नवीन योजना सुरू केली आहे.

Reliance Jio (Photo Credits: Twitter)

गेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स जिओने (Reliance Jio) भारतीय बाजारामध्ये आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता वापरकर्त्यांचा अनुभव अजून सुधारण्यासाठी जियोने पोस्टपेड प्लस (Jio PostPaid Plus) ही नवीन योजना सुरू केली आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सर्व्हिस कनेक्टिव्हिटी, करमणूक आणि एक वेगळा अनुभव प्रदान करणे हा या योजनेचा शुभारंभ करण्याचा उद्देश आहे. या योजनेत वापरकर्त्यांना अनेक खास फायदे देण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये नेटफ्लिक्स (Netflix), Amazon Prime आणि डिस्ने+हॉटस्टार (Disney Plus Hotstar) मोफत मिळत आहे. तसेच कॉलिंग बेनिफिटसुद्धा यात देण्यात आले आहेत. चला पाहूया या प्लॅनबद्दल सविस्तर -

काही महत्वाचे फायदे –

टेरिफ प्लॅन्स -

टेरिफ प्लॅनची किंमत 399 रुपयांपासून सुरु होऊन 1,499 रुपये पर्यंत आहे.

399 रुपयांचा प्लॅन –

या योजनेत 75 जीबी डेटा उपलब्ध आहे. अमर्यादित व्हॉईस आणि एसएमएसचा चाही फायदा आहे. त्यामध्ये नेटफ्लिक्स, Amazon Prime आणि डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना यात 200 जीबी डेटा रोलओव्हर मिळेल.

599 रुपयांची प्लॅन -

599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 जीबी डेटा उपलब्ध आहे. अमर्यादित व्हॉईस आणि एसएमएस चाही फायदा आहे. त्यामध्ये नेटफ्लिक्स, Amazon Prime आणि डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना यात 200 जीबी डेटा रोलओव्हर मिळतो. तसेच, फॅमिली प्लानसाठी यामध्ये एक अतिरिक्त SIM मिळेल.

799 रुपयांचा प्लॅन -

हा प्लॅन अगदी 599 सारखाच असून, फक्त यामध्ये ग्राहकांना 150 जीबी डेटा मिळतो. फॅमिली प्लॅनसाठी यामध्ये दोन अतिरिक्त SIM मिळतील. (हेही वाचा: हॉटस्टार अ‍ॅप कसे डाउनलोड करावे? पाहा 'या' सोप्प्या Steps आणि लुटा आयपीएलचा आनंद)

999 रुपयांचा प्लॅन –

यामध्ये बाकी गोष्टी सारख्याच असून ग्राहकांना 200 जीबी डेटा मिळतो. रोलओव्हरसाठी 500 जीबी डेटा मिळेल व फॅमिली प्लॅनसाठी 3 अतिरिक्त SIM मिळतील.

1,499 रुपयांचा प्लॅन –

यामध्ये ग्राहकांना 300 जीबी डेटा मिळतो. बाकी सर्व गोष्टी सारख्याच असून, रोलओव्हरसाठी 500GB डेटा मिळेल. यामध्ये यूएसए आणि युएईसाठी अमर्यादित डेटा आणि व्हॉइसचाही फायदा मिळणार आहे.