Instagram चे नवे फिचर, कंप्युटरच्या माध्यमातून आता युजर्सला Direct Message करता येणार
त्यानुसार आता युजर्सला इन्स्टाग्राम अॅप सुरु न करता तुमच्या कोणत्याही मित्रमैत्रीणीला मेसेज करता येणार आहे.
इंन्स्टाग्रामने (Instagram) त्यांच्या युजर्ससाठी कंपनीने एक नवे फिचर रोलआउट केले आहे. त्यानुसार आता युजर्सला इन्स्टाग्राम अॅप सुरु न करता तुमच्या कोणत्याही मित्रमैत्रीणीला मेसेज करता येणार आहे. कारण आता कंपनीने हेच नवे फिचर लॉन्च केले असून युजर्सला त्याच्या माध्यमातून मेसेज पाठवणे अधिक सोपे होणार आहे. कंपनीने या फिचर बाबत ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, 'Sliding into your DMs' त्यामुळे कंप्युटरच्या माध्यमातून इन्स्टाग्रामचे डायरेक्ट मेसेज (Direct Message) पाठवता येणार आहे.(इन्स्टाग्रामचा वापर करण्याअगोदर नव्या युजर्सना दयावी लागणार 'ही' माहिती)
इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजच्या फिचर बाबत गेल्या काही काळापासून युजर्स वाट पाहत होते. त्यानंतर हे फिचर आता युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. युजर्सला आता लॅपटॉप किंवा कंप्युटरच्या माध्यमातून इन्स्टाग्राम सुरु केल्यास तेथे मेसेजिंग करण्याचा ऑप्शन दिसणार आहे. डायरेक्ट मेसेजिंगचे फिचर हे मोबाईल अॅप सारखेच आहे. युजर्सला एखाद्यासोबत चॅटिंग करण्यासोबत नवीन ग्रुपसुद्धा तयार करता येणार आहे. युजर्सने जर एखाद्या मेसेजवर डबल टॅक केल्यास ती पोस्ट किंवा मेसेज लाईक केला जाणार आहे.(इन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस)
यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक नवं फिचर आले होते. त्यामध्ये कोणत्याही थर्ड पार्टी अॅपच्या मदतीशिवाय युजर्सना त्यांच्या 'स्टोरी स्टेटस'मध्ये एकावेळी 6 फोटो शेअर करता येणार आहेत. यापूर्वी युजर्स थर्ड पार्टी अॅपमधील लेआऊटच्या मदतीने एकावेळी 2 ते 3 फोटो कोलाज करून शेअर करू शकत होते. परंतु, आता इन्स्टाग्रामने त्यात दुरुस्ती करत नवीन फिचर्स आणले आहे. या फिचर्समुळे इन्स्टाग्राम युजर्सना एकाच स्टोरी स्टेटसमध्ये 6 फोटो शेअर करता येणार आहे. इन्स्टाग्रामने या नव्या फिचरला 'ले-आऊट' फिचर्स असे नाव दिले आहे. आपल्या मोबाइलमधील गॅलरीमध्ये असलेल्या छायाचित्रांचा वापर करून फोटो ग्रीड फॉरमॅट तयार केला जाऊ शकतो. तसेच इन्स्टाग्राम युजर्स इन्स्टा कॅमेराचा वापर करूनही ग्रीड फॉरमॅटमध्ये फोटो तयार करू शकतात.