इंस्टाग्रामवर NameTag फिचरची धूम, युजर्सना मिळणार डिजिटल आयडी

तरुणाईमध्ये विशेष आकर्षण असलेल्या या ऍपमध्ये वेळोवेळी नवनवी आणि इंटरेस्टिंग फीचर्स दिली जातात.

नेम टॅग फिचर (Photo Credit: Mashable)

इंस्टाग्राम हे लोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप आहे. तरुणाईमध्ये विशेष आकर्षण असलेल्या या ऍपमध्ये वेळोवेळी नवनवी आणि इंटरेस्टिंग फीचर्स दिली जातात. नुकतेच इंस्टाग्राममध्ये नेम टॅग फिचर देण्यात आलं आहे. या फीचरमुळे लोकांना शोधणं आणी योग्य व्यक्तीशी कनेक्ट होणं सोप्प होणार आहे. नेम टॅग हा डिजिटल आय डी चा एक प्रकार आहे. इंस्टाग्रामवरच तुम्हांला तुमचा आयटी मिळणार आहे. आणि तो . तुम्ही इतरांना पाठवून कनेक्टमध्ये राहू शकणार आहात.

कसा  मिळवलं तुमचा नेम टॅग?

तुमच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नेम टॅग चा पर्याय दिसेल.

नेम टॅगमध्ये फोटो, सेल्फी, स्टिकर आणि विविध रंगाचा वापर केला जाऊ शकतो.

तुमचं नेम टॅग विविध सोशल मीडियावर तुम्ही शेअर करू शकता.

इतर व्यक्तीचेही नेम टॅग तुमच्या कडे ओपन करून त्याच्याशी कनेक्ट होणं आता शक्य आहे.