Infinix X1 Android स्मार्ट टिव्ही भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत

इन्फिनिटी एक्स 1 स्मार्ट टिव्ही SBI च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.

Infinix X1 android tv (Photo Credits-Twitter)

Infinix X1 Android स्मार्ट टिव्ही भारतात लॉन्च करण्यात आला आहे. याची सुरुवाती किंमत 11,999 रुपये आहे. या स्मार्ट टिव्हीसाठी पहिला सेल येत्या 18 डिसेंबरला दुपारी 12 वाजता असणार आहे. इन्फिनिटी एक्स 1 स्मार्ट टिव्ही SBI च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. त्यानुसार ग्राहकांना 10 टक्के डिस्काउंट ही दिला जाणार आहे. ऐवढेच नाही तर SBI च्या EMI ची सुविधा ही खरेदीवर मिळणार आहे. कंपनीच्या या स्मार्ट टिव्हीसाठी विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर करण्यात येणार आहे. (Moto G9 Power स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Infinix X1 हा स्मार्ट टिव्ही बेजेललेस डिझाइनसह उतवरण्यात आला आहे. स्मार्ट टिव्हीच्या खालील बाजूस स्पिकर्स दिले गेले आहेत. हा अॅन्ड्रॉइड टिव्ही TUV Rheinland सर्टिफाइड असून जो ब्लू किरणांपासून डोळ्यांचा बचाव करतो. तसेच Infinix X1 मध्ये EPIC 2.0 Picture Engine आणि HDR तंत्रज्ञानाचा ही वापर केला आह. जो कलर शार्पनेस, कॉन्ट्रास्ट आणि 400 nits मॅनेज करतात.(Samsung Lunch 110" Micro LED TV: सॅमसंग ने लॉन्च केला 110 इंचाचा नवा मायक्रो LED टीव्ही; जाणून घ्या, काय आहे किंमत आणि खासियत?)

Tweet:

अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यासाठी ट्रु बेजेल लेस डिझाइन आणि हाय स्क्रिन बॉडी टू रेश्यो दिला आहे. स्मार्ट टिव्ही Dobly Atmos आणि Dolby Digital Plus ऑडिओ सपोर्ट ही करणार आहे. तसेच 24W पर्यंतचे स्पिकर दिले आहेत. X1 स्मार्ट टिव्हीमध्ये Amazon Prime, Netflix, Youtube सारखे प्री-इन्स्टॉल अॅप्स ही मिळणार आहेत.