Bluetooth गॅजेट्स वापरत असल्यास सावधान, तुमचा पर्सनल डेटा चोरी होण्याची शक्यता
मात्र या गॅजेट्सच्या बाबत एका अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
सध्याच्या दिवसात फिटनेस ट्रॅकर, स्मार्टवॉच, स्मार्ट स्पीकर आणि स्मार्टहोम सारखे गॅजेट्स तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मात्र या गॅजेट्सच्या बाबत एका अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार हे सर्व स्मार्ट गॅजेट्स मधून युजर्सचा पर्सनल डेटा चोरी होण्याची फार शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत लो एनर्जी ब्लूटुथ डिवाइस मधून हॅक होण्याची शक्यता फार असते. कंप्युटर अॅन्ड कम्युनिकेशन सिक्यॉरिटी संबंधित लंडन येथे सुरु असलेल्या एका कॉफ्ररेन्समधून ही गोष्ट समोर आली आहे.
गॅजेट्सबाबत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार मोबाईल अॅप सोबत डिवाइस ब्लुटुथच्या माध्यमातून कनेक्ट केले जाते त्यावेळीच ते हॅक होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर डिवाइस ऑपरेट केल्यास त्यावेळी सुद्धा तो अगदी सहज हॅक केला जाऊ शकतो. फिटनेस ट्रॅकर, स्मार्ट थर्मोस्टेट, स्मार्ट स्पीकर किंवा स्मार्ट होम सारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या माध्यमातून हॅकर्सला हॅकिंग करणे सोपे होते.
युजर्सचा पर्सनल डेटा हॅक करुन त्याचा गैरवापर यापूर्वी सुद्धा करण्यात आला आहे. तर या आधी ही स्ट्रिमिंग सर्विसचा अधिक वापर केल्यास तुमच्या प्रायव्हसीला धोका उद्भवू शकतो. एका रिसर्जमध्ये असे समोर आले आहे की, काही युजर्स त्यांच्याबाबत माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करता. तरीही त्यांच्या नकळत युजर्सचा डेटा कंपनीला विकला जातो.(Facebook Pay या सुविधेमुळे आता Messenger, WhatsApp, आणि Instagram च्या माध्यमातून करू शकाल आर्थिक व्यवहार)
तसेच सध्या हेल्पलाईनच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या पद्धतीची ग्राहकांची फसवणूक करण्याठी UPI पेमेंट्स रिक्वेस्ट किंवा व्हॉट्सअॅपवर एक QR कोड पाठवत त्याचा उपयोग पैशांची चोरी करण्यासाठी करतात. नुकत्याच फसवणुकीच्या घटनांबाबत बोलायचे झाल्यास गुगल आणि जस्ट टायलवर दिलेल्या चुकीच्या कस्टमर केअर क्रमांकामुळे फसवणुक करणाऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.