Huawei FreeBuds 4i भारतात लॉन्च; पहा काय आहे खासियत आणि किंमत
जाणून घेऊया त्याविषयी...
हुवाई (Huawei) कंझ्युमर बिझनेस ग्रुपने सोमवारी (25 ऑक्टोबर) भारतात वायरलेस इयरबड्स (Wireless Earbuds) लॉन्च केले. फ्रीबड्स 4i (FreeBuds 4i) असे या इयरबड्सचे नाव आहे. या वायरलेस इयरबड्सची किंमत 7,990 रुपये इतकी असून ते सिरेमिक व्हाईट (Ceramic White), कार्बन ब्लॅक (Carbon Black), रेड (Red) आणि सिल्व्हर फ्रॉस्ट (Silver Frost) असे कलर ऑप्शन्स यामध्ये उपलब्ध आहेत. FreeBuds 4i 27 ऑक्टोबरपासून अॅमेझॉनवर (Amazon) ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. यापूर्वी Huawei ने FreeBuds 3i देखील भारतात सादर केले होते.
HUAWEI FreeBuds 4i लॉन्च केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या विश्वासू ग्राहकांसोबत हा सण साजरा करण्यासाठी हे नवीन प्रॉडक्ट आणि सणासुदीच्या ऑफर आम्ही लॉन्च करत आहोत, असे Huawei India च्या ग्राहक व्यवसाय समूहाचे उपाध्यक्ष ऋषी किशोर गुप्ता म्हणाले. (Huawei ने लॉन्च केले लिपस्टिकच्या आकाराचे TWS ईअरबड्स, 14 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Watch GT3)
फ्रीबड्स 4i मधील नवीन तंत्रज्ञानामुळे नॉईस कॅन्सलेशन खूप चांगल्या प्रकारे होते. फ्रीबड्स 4i युजरला त्यांच्या सभोवतालची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांशी स्पष्टपणे संवाद साधण्यासाठी 'Awareness' मोड उपलब्ध आहे. दिवाळी ऑफरअंतर्गत 5 नोव्हेंबरपर्यंत 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.
फ्रीबड्स 4i मध्ये 10 मिमी मोठे डायनॅमिक ड्रायव्हर आहे ज्यामुळे बास (Baas) चा छान अनुभव घेता येतो. हे इयरबड्स पूर्ण चार्ज केले असता 10 तासांचे प्लेबॅक म्युझिक किंवा 6.5 तासांचे व्हॉइस कॉल चालतात. हे इयरफोन फक्त 10 मिनिटांच्या फास्ट चार्जसह 4 तास ऑडिओ प्लेबॅक देऊ शकतात.