HTC Wildfire R70 भारतात लॉन्च, युजर्सला मिळणार जबरदस्त फिचर्स
ताइवानची स्मार्टफोन निर्माती कंपनी HTC ने भारतीय मार्केटमध्ये एक मिड-रेंड हॅडसेट लॉन्च केला आहे. HTC Wildfire R70 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून दोन रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
ताइवानची स्मार्टफोन निर्माती कंपनी HTC ने भारतीय मार्केटमध्ये एक मिड-रेंड हॅडसेट लॉन्च केला आहे. HTC Wildfire R70 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून दोन रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर लवकरच आता सेलमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही पण त्याला HTC Wildfire X स्मार्टफोनचा सक्सेसर असे म्हटले जात आहे.या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा पिक्सल रेजोल्यूशन 720X1560 आहे.
एचडीसी वाईल्डफायर आर 70 स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी 20 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅमपेक्षा कमी आहे. तसेच 32 जीबीचा इंटरनल स्टोरेज सुद्धा देण्यात आला आहे. पण मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 2 टीबी पर्यंत वाढवता येणार आहे. हा स्मार्टफोन 9 पायवर काम करतो.(Samsung Galaxy Z Flip ची प्री बुकिंग आजपासून सुरु, किंमत ऐकून तुमचे ही डोळे चक्रावतील)
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रेयर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सल असून त्याचा अपरेचर f/1.7 आहे. दुसरा मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसरमध्ये f/2.4, तिसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसरचा अपरेचर f/2.4 आहे. तसेच मोबाईलच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिला आहे. कनेक्टिव्हीसाठी फोनमध्ये 4G, VoLTe,3G,Wifi, Bluetooth आणि GPS सारखे फिचर्स आहेत.HTC एका 5G स्मार्टफोनवर सुद्धा काम करत आहे. कंपनीचे CEO Yves Maitre यांनी असे म्हटले आहे की, कंपनी 5G फोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन याच वर्षात लॉन्च करण्यात येणार आहे. यासाठी HTC US वायरलेस ऑपरेटर Sprint सह मिळून काम करत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)