How to Watch IPL 2021 For Free: घरी बसल्या फ्रीमध्ये लुटा आयपीएलची मजा, Jio ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये मोफत मिळते Disney+ Hotstar ची मेंबरशिप
स्पर्धेचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. यंदा देखील चाहत्यांना घरी बसल्याच आयपीएलची मजा घ्यावी लागणार आहे. आयपीएल 2021 मोबाइल फोनमधील Disney+ Hotstar वर लाईव्ह पाहिले जाऊ शकते.
How to Watch IPL 2021 For Free: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14वा हंगामासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहेत. स्पर्धेचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे रोजी आयोजित केला जाणार आहे. यंदा भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रकरणात होणारी वाढ लक्षात घेता स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीला मनाई करण्यात आली असल्यामुळे यंदा देखील चाहत्यांना घरी बसल्याच आयपीएलची (IPL) मजा घ्यावी लागणार आहे. आयपीएल 2021 मोबाइल फोनमधील डिस्नी+ हॉटस्टारवर लाईव्ह पाहिले जाऊ शकते. Disney+ Hotstar ची मेंबरशिप ची किंमत 399 रुपये आहे. परंतु आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या प्रीपेड योजनांबद्दल (Jio Prepaid Plans) सांगणार आहोत ज्यामध्ये चाहत्यांसाठी विनामूल्य मेंबरशिप उपलब्ध असेल. (IPL 2021 Schedule in PDF for Free Download: इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या सीजन मधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण)
रिलायन्स जिओची 401 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या प्लॅनची ही सर्वात स्वस्त योजना आहे ज्यात डिस्नी+ हॉटस्टारची मेंबरशिप विनामूल्य दिली जाते. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, 6 जीबी अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण 90 जीबी डेटा यूजर्सना उपलब्ध होईल. शिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सची मोफत मेंबरशिप देखील उपलब्ध असेल.
जिओचा 598 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅन अंतर्गत यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध होईल. याची वैधता 56 दिवस असून एकूण 112 GB डेटा वापरण्यास मिळतो. शिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फोनकॉल आणि 100 एसएमएस देखील मिळतात. तसेच एक वर्षासाठी डिस्नी+ हॉटस्टारची मेंबरशिप आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळेल.
जिओचा 777 रुपयांचा प्लॅन
जिओचा 777 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. याअंतर्गत दररोज 1.5 जीबी डेटा आणि 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. अशा प्रकारे ग्राहकांना एकूण 131 जीबी डेटा मिळतो. या योजनेत सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज देण्यात येतील. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना एक वर्षासाठी डिस्नी+ हॉटस्टारची मेंबरशिप आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल.
जिओचा 2599 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओ हा सर्वात महाग प्लॅन आहे ज्यात वर्षभर डिस्नी+ हॉटस्टारची मेंबरशिप विनामूल्य दिली जाते. याची वैधता 365 दिवस असून यूजर्स दररोज 2 जीबी डेटा वापर करू शकतात. याव्यतिरिक्त, 10 जीबी अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण डेटा 740 जीबी डेटा यूजर्सना मिळेल. याशिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सची मोफत मेंबरशिप देखील दिली जाते.