एकाच मोबाईलवर दोन WhatsApp अकाउंट कसे वापराल? जाणून घ्या 'या' सोप्प्या ट्रिक्स

या अॅप्लिकेशनमध्ये असे काही फिचर्स आहेत त्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसते. पण दुसरा व्यक्ती वापरत असताना ते पाहून आपल्याला सुद्धा त्याची उत्सुकता लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एकाच मोबाईल मध्ये दोन व्हॉट्सअॅपचे अकाउंट कसे तुम्ही वापरु शकता याबद्दल सांगणार आहोत.

WhatsApp (Photo Credits: Lifewire)

सध्याच्या जीवनात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपण आपली बहुतांश कामे पार पाडण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतो. तसेच ही कामे करण्यासाठी स्मार्टफोन मध्ये विविध अॅप्लिकेशन्स सुद्धा दिले जातात. यामधील एक लाखो-करोडोंच्या संख्येने युजर्स असलेले WhatsApp सध्या एकमेकांना जोडण्यासाठी महत्वाचे काम करत आहे. या अॅप्लिकेशनमध्ये असे काही फिचर्स आहेत त्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसते. पण दुसरा व्यक्ती वापरत असताना ते पाहून आपल्याला सुद्धा त्याची उत्सुकता लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एकाच मोबाईल मध्ये दोन व्हॉट्सअॅपचे अकाउंट कसे तुम्ही वापरु शकता याबद्दल सांगणार आहोत. त्यासाठी काही सोप्प्या ट्रिक्स फक्त वापरण्याची गरज आहे.

बाजारात नवनव्याने येणाऱ्या सगळ्याच स्मार्टफोन निर्माती कंपनी क्लोनिंगचा ऑप्शन देतात त्यानुसार तुमची कामे जी दोन स्मार्टफोन वरुन करण्याऐवजी एकाच स्मार्टफोनवरुन तुम्हाला करतात. अशाच पद्धतीने व्हॉट्सअॅप सुद्धा काम करते. तर येथे पहा कसे तुम्ही दोन व्हॉट्सअॅप अकाउंट एकाच मोबाईल मध्ये कसे वापरु शकता.(How to Make Account on Netflix: नेटफ्लिक्सवर स्वत:चे अकाउंट बनविण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स)

-एकाच स्मार्टफोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी प्रथम मोबाईलच्या सेटिंग मध्ये जावे लागणार आहे.

-तेथेच खाली तुम्हाला अॅप्लिकेशन आणि परमिशन असे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यास तुम्हाल अॅप क्लोनचा ऑप्शन ही मिळेल. यावर क्लिक करा.

-अॅप क्लोनमध्ये तुम्हाला फोनमधील सर्व अॅप्लिकेशन पहायला मिळतील. त्यामध्ये WhatsApp वर क्लिक करा. येथे क्लोन अॅप असे ही ऑप्शन दिसेल ते केल्यानंतर व्हॉट्सअॅप क्लोन बनेल.

मुख्य म्हणजे तुमच्या सेटिंगमध्ये हे फिचर नसल्यास वरील बाजूस असलेल्या सर्च बारमध्ये अॅप क्लोन, ड्युअल अॅप किंवा Twin असे लिहून सर्च करु शकता. असे केल्यास तुम्हाला थेट अॅफ क्लोनपर्यंत पोहचता येईल.(How to Repost a Story on Instagram: इंस्टाग्रामवर स्टोरी रिपोस्ट कशी कराल? फॉलो करा '6' सोप्या स्टेप्स)

तसेच तुमच्या स्मार्टफोनमध्ये क्लोन फिचर नसेल तर तुम्हाला मात्र वेगवेगळ्या क्रमांकाने व्हॉट्सअॅप सुरु ठेवू शकता.यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोर वर असलेल्या Parallel Space सारखे क्लोन मेकिंग अॅपचा आधार घेऊ शकता. हे अॅप क्लोन फिचर सारखेच स्मार्टफोनमध्ये काम करतात.

WABetaInfo यांच्या रिपोर्टनुसार, Instagram प्रमाणेच WhatsApp मध्ये Expiring Media फिचर येणार आहे. त्यामुळे फोटो, व्हिडिओ आणि GIF आपोआप डिलिट होणार आहेत. WhatsApp च्या नव्या फिचर Expiring Media मध्ये युजर्सला फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना टाइम लिमिट सेट करण्याचा ही ऑप्शन मिळणार आहे. अशा वेळी तुम्ही ठरवलेल्या वेळेत तो फोटो किंवा व्हिडिओ एक्सेस करता येणार आहे. त्यानंतर WhatsApp वर पाठवलेला फोटो आणि व्हिडिओ आपोआप डिलिट होणार आहे. सध्या या फिचरच्या लॉन्चिंगबद्दल तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.